pani puri: पाणीपुरी खाल्ल्याने काय होते, जाणून घ्या सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाणीपुरी या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पाणीपुरी खाल्ल्याने फायदे होतात का नुकसान, पाणीपुरी आपल्या शरीराला चांगली आहे का नाही. पाणीपुरीचे पाणी हे कशा पद्धतीने बनवले जाते त्याचबरोबर पाणी बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा वापर केला जातो तसेच ते पाणी पिल्याने आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना? तसेच ही पाणीपुरी बहुतेक जणांना आवडते. अगदी लहान ते मोठ्या माणसांपर्यंत, पाणीपुरी हे खूप पॉप्युलर आहे. पाणीपुरी म्हटलं तर सर्वांनाच खावेसे वाटते. पाणीपुरी बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात. तसेच ही पाणीपुरी लहान मुलांनी खावी का? लहान मुलांसाठी योग्य आहे का पाणीपुरी ची प्लेट कशाप्रकारे सजवली जाते. अशा प्रकारची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. जाणून घेऊया पाणीपुरी बद्दल भरपूर माहिती
पाणीपुरी ही एक डिश आहे जे तुम्ही घरी बनवू शकता तसेच या पाणीपुरीचे बाहेर गाडे लावलेले असते. गाड्या वरची पाणीपुरी खूपच भारी लागते. कारण त्या पाणीपुरीचे पाणी पाणीपुरीला चव देतात. त्याच बरोबर अनेक ठिकाणच्या पाणीपुरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चव असते. कोणाला चव आवडते तर कोणाला नाही आवडत. बहुतेक जणांचे पाणीपुरीचे गाणे हे फिक्स असतात. की तिथे जाऊन पाणीपुरी खायची नाहीतर खायचीच नाही कारण त्या ठिकाणची पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मनच भरत नाही. पाणीपुरी ने पोट तर भरत नाही पण मन नक्कीच मिळते. असे या जगात कुठलेही ठिकाण नसेल त्या ठिकाणी पाणीपुरी हा पदार्थ नसेल पाणीपुरी हा पदार्थ सर्वत्र पसरलेला आहे जणू काही हा एक निसर्गातच भाग आहे की काय, पाणीपुरीचे अनेक जाग्यावर गाडी लावलेले असतात. गावोगावांमध्ये ही पाणीपुरी भेटतेच कोठे फिरायला गेलो आणि पाणीपुरी नाही खाल्ली असे कधी होतच नाही. कारण पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही.
पाणीपुरी खाल्ल्याने शरीराला अशाप्रकारे फायदा होतो
बहुतेक जण म्हणतात पाणीपुरी शरीरासाठी चांगली नाही परंतु असे काही नाही पाणीपुरी खाल्ल्याने खूप फायदे होतात. कारण जे पाणीपुरीचे पाणी असते ते शरीरासाठी खूपच फायदेमंद असतात. त्या पाण्यात अनेक प्रकारचे मसाले मिसळलेले असतात. त्यामुळे ते पाणी चविष्ट लागते तसेच या पाण्यामुळे पोटातील समस्या देखील दूर होते. या पाणीपुरीचे पाण्यामध्ये पुदिना, कोथिंबीर तसेच काळ मीठ हिरवी मिरची, ववा, जिरे, अद्रक अशा प्रकारचे मसाले मिक्स केले जातात आणि हे मिक्स करून पाणीपुरीचे पाणी बनवले जाते या मसाल्यामुळे पोटाची समस्या दूर होते तसेच ज्या व्यक्तीला सतत गॅस होतो त्यांनी हे पाणीपुरीचे पाणी पिल्यास गॅसची समस्या दूर होते, तसेच या पाण्यामुळे वजन देखील कमी होते. कारण पाणीपुरीचे पाणी हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात त्यात वेगवेगळे मसाले मिक्स केले जातात. तसेच या पाणीपुरीमुळे पोट देखील साफ होते.
पाणीपुरीचे पाणी आणि पुऱ्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया
मित्रांनो आपण सुरुवातीला पाणीपुरीचे पाणी कसे बनवायचे हे पाहूया गोड पाणी म्हणजेच आंबट पाणी कसे बनवायचे हे सर्व ते पाहू आंबट पाणी बनवण्यासाठी चिंच, खजूर आणि गुळ हे मिक्स करून पंधरा मिनिटे भिजण्यासाठी पाण्यात ठेवावे. त्यानंतर भिजल्यानंतर ते कुकरमध्ये टाकून थोडं वाफवून घ्यावे वापरल्यानंतर चिंच चांगल्या प्रकारे शिजवून निघते शिजल्यानंतर थंड झाल्यास ते गाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे जेणेकरून असलेले दोर्या निघून जाईल. गाळून घेतल्यानंतर त्या मध्ये थोडेसे लाल तिखट धने पावडर चाट मसाला टाकून मिक्स करून घ्यावे आणि हे पाणी तयार झाले. आता
बनवूया तिखट पाणी
तिखट पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात 1 कप कोथिंबीर 4-5 हिरव्या मिरच्या, 1 ते1/2 कप पुदिना, त्यात थोडेसे मीठ, काळे मीठ,1 लिंबू, एक चमचा पाणीपुरी मसाला, एक चमचा धने आणि जिरे पावडर, एक इंच आलं, हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढावे. आणि लिंबू वरतून थोडसं पिळावे जेणेकरून जास्त तिखट लागणार नाही आणि थोडं आंबट लागेल. हे मिश्रण एका भांड्यात टाकावे तुम्हाला लागेल तसे पाणी टाकावे त्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे किंवा बर्फ असेल तर दोन ते तीन तुकडे बर्फाचे त्यात टाकावे जेणेकरून पाणी थंड होईल.
पाणीपुरी मध्ये टाकण्यासाठी भाजी
पाणीपुरी खाताना त्यात भाजी असेल तर पाणीपुरी खूप टेस्टी लागते. भाजी बनवण्यासाठी दोन कप शिजलेले पांढरे वाटाणे, चार उकडलेले बटाटे, एक कप शिजलेला मूग, एक चमचा हळद, एक चमचा चाट मसाला, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व पदार्थ मिक्स करून पाणीपुरीसाठी भाजी तयार होते.
पुरी बनवण्यासाठी
पाणीपुरी मधील पुरी बनवण्यासाठी तुम्हाला एक गरा आणि एक आटा हे दोन्ही एकत्र करून त्यात थोडं तेल टाकून पाण्याने चांगले मळून घ्यावे मळताना जसे लागेल तसे पाणी वापरून व्यवस्थित मळावे त्यानंतर मळलेले पीठ हे पंधरा मिनिटं झाकून भिजण्यासाठी ठेवावे. पीठ भिजल्यानंतर त्याचे लहानसे गोळे तयार करून घ्यावे. त्यानंतर हे गोळे लाटणेने छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात त्यानंतर तेल तापण्यासाठी ठेवावे तेल तापल्यानंतर ह्या पुऱ्या एकेक करून तेलात सोडाव्यात पुऱ्या तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा त्याचबरोबर पुरीही एक साईडने तळावी त्या पुरीला पलटून तळू नये तळताना पुरीवर तेल टाकावे जेणेकरून समोरचा भाग आहे तळला जाईल. पुऱ्या तळल्यानंतर पुण्यातल्या तेल जाईल अशा पातेले टाकावे. त्यानंतर पुऱ्या थंड झाल्या की त्या खाण्यासाठी घ्याव्यात.
पुरी खाताना प्लेटची सजावट अशाप्रकारे करावी
सर्वात आधी एका प्लेटमध्ये जेवढ्या चार पाच पुढे बसतील त्यात टाकाव्या, टाकताना त्या फोडून टाकाव्यात तसेच त्यामध्ये केलेली भाजी टाकावी ज्यांना आवडते त्यांनी, त्यानंतर त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टाकावी तसेच तिखट आणि आंबट पाणी टाकावं, त्यानंतर वरतून बारीक शेव टाकावी बारीक शेव थोडं थोडं काळ मीठ मुलींच्या वर टाकावे त्यामुळे खूप चव लागते. अशा रीतीने पुरीची प्लेट तयार आहे. तुम्ही आता पुरी खाण्यासाठी घेऊ शकता. या पुऱ्या बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. कधीही पुरी तोंडात जाते असे वाटते. अशा पद्धतीने पुरी बनवल्यास पुरीही खूप छान होते. अगदी खुसखुशीत अशाप्रकारे आपल्या पाणीपुरी बनवून तयार होईल.
पाणीपुरी खाण्याचे जाणून घेऊया
पाणीपुरी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात ते आपण येथे पाहूया
पाणीपुरी खाल्ल्याने कॅलरीज वाढते, तसेच भूक लागत नाही भूक न लागल्यामुळेच वजन कमी होते, ऍसिडिटी असल्यास ऍसिडिटी समस्या दूर होते, पाणीपुरीच्या तिखट पाण्यामुळे पोटातील असलेले गॅस कमी होत, वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त होते, त्याच प्रकारे पाणीपुरीच्या पाण्यामुळे पोट शांत होते, तसेच तोंड आल्यास तोंड बरे होते. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त असे प्रथिने असतात त्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फ्लॅट जास्त आणि जीवनसत्वे त्याचबरोबर A,B-6,B-12,C आणि D इत्यादी असतात.
पाणीपुरीमुळे होणारे नुकसान
पाणीपुरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने काय नुकसान होते जाणून घेऊया.
पाणीपुरी ही जास्त प्रमाणात खाणे चांगले नाही. कारण जे पाणीपुरीसाठी पाणी वापरले जाते. ते पाणी कसे असते हे कोणालाच माहित नसते. तसेच जर हे पाणी फिल्टर नसेल तर या पाण्यामुळे जठराची समस्या उद्भवते. त्याच प्रकारे पाणीपुरी जरी खायला स्वादिष्ट लागत असेल तरी देखील पाणीपुरी शरीरासाठी चांगली नाही कारण या पाणीपुरी मध्ये चरबी आणि कॅलरीज चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याची भीती असते. काही वेळेस या पाणीपुरीच्या पाण्यामुळे कॅलेस्ट्रॉन आणि रक्तदाब झपाट्याने वाढू लागतात. त्यामुळे पाणीपुरी ही मापातच आणि कधीतरी खावे. कारण जरी पाणीपुरीचे काही फायदे असेल तरी पाणीपुरीचे नुकसान देखील तितकेच आहेत.pani puri