MOBAIL PARINAM : मोबाईल वापरणे कितपत योग्य, लगेच जाणून घ्या पूर्ण माहिती

MOBAIL PARINAM :  मोबाईल वापरणे कितपत योग्य, लगेच जाणून घ्या पूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की मोबाईल वापरणे कितपत योग्य आहे. मोबाईल वापरायला हवा की नाही. मोबाईल वापरल्याने कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात. मोबाईल वापरण्याचे काही फायदे आहेत का? नाही तसेच मोबाईल वापरण्याचे काही प्रकार आहेत का तसेच तुम्ही मोबाईल वापरत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मोबाईल लहान मुलांपासून दूर ठेवता की त्यांच्यापाशी देता. लहान मुलांना मोबाईल देणे कोणते वाईट परिणाम होतात का याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो हा मोबाईल जणू काही आपल्या घरातला एक सदस्य की काय असे झाले आहे सर्वांचे! सर्वांना असे वाटायला लागले आहे की आपल्या जवळच व्यक्ती कोणी असेल तर तो आपला स्वतःचा मोबाईल तो सर्व काही आपल्या मनातलं मोबाईलवर शेअर करत राहतो शेजारी कोणी बसले का नाही याचा विचारही करत नाही त्यांना त्यांचे भानही राहत नाही की आपण शेजारी बसलेल्या व्यक्तीला थोडं बोलावं आपल्या मनातलं काही सांगावं ते सतत मोबाईल मध्ये गुंतलेले असतात त्यांना इतरांची कुठलीही काळजी नसते ते मोबाईललाच आपले सर्व काही समजतात. तसेच आता मुलांचेही व्हायला लागले आहे. मुले शाळेपेक्षा अभ्यासापेक्षा मोबाईल कड जास्त आकर्षित होत चालले आहेत. मुलांना शाळा आणि अभ्यास हे कठीण वाटत आहे आणि मोबाईल सोपा. मुलांनी खेळ खेळणे बंद केले आहे मुले रस्त्यावर पडताना दिसत नाहीत खेळताना कुडतांना दिसत नाही ते मुले एकीकडे बसलेले आहेत आणि त्यांच्या हातात फक्त मोबाईल आहे.

मुलांनी खाणे पिणे सोडले आहे. त्यांना जीव घालावे लागते जेवताना देखील त्यांना हातात मोबाईल हवा असतो त्याशिवाय ते जिवत नाही पालकांना नाविला जाणे मोबाईल त्यांच्या हातात द्यावा लागतो. परंतु ही सवय त्या मुलांना पालकांनी लावलेली असते कारण ज्या वेळेस मुलं तर त्यावेळेस मुलाच्या हातात मोबाईल दिला जातो तेव्हा ते मूळ शांत होतं असंच करत करत मुलांना शांत करण्याची सवय पालकांना लागली आणि मुलांना मोबाईलची सवय लागली आता मुले हातातून मोबाईल सोडत नाहीत आणि अभ्यासात मन घालवतही नाहीत मुलांना अभ्यास काय आहे हे माहितही नाही अगदी लहानशा मुलाला मोबाईल मधलं सर्व काही येत पहिल्या काळी कोणाकडेही मोबाईल नव्हता त्यावेळेस कोणाला मेसेज द्यायचा असेल तर पत्र पाठवावे लागायचे परंतु या औद्योगिक काळामुळे सर्व काही सोपे झाले आहे परंतु सर्वजण त्या मोबाईलच्या आहारी गेले आहेत.

पहिल्या काही मुले नवनवीन खेळ खेळायचे गप्पागोष्टी करायचे भांडायचे खुदायचे रस्त्याने पळताना दिसायचे अनेक खेळ मुले खेळत असायचे सतत मुलांचा आढावडा ऐकू यायचा परंतु आताच्या काळात मुलांचा असा आवाज येणे बंद झाले आहे. मुले आता स्वतःच्याच नादात आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर खूपच वाईट संस्कार पडत आहेत. मुले नाही ते पाहतात आणि तसेच कृत्य करतात. काही वेळेस अशा काही घटना घडतात त्या घटनेमुळे पालकांना आपल्या गमावा लागतो. कारण मोबाईल मधील पाहून जे मुले कृत्य करण्यासाठी जातात ते त्यांना करता येत नाही म्हणून म्हणतो दुसरं काही होतं. तसेच मुले मोबाईलच्या नादामध्ये आपण लहान आहोत याचे भान राहत नाही ते मुले मोठ्यांचा आदर करत नाही जे मोबाईल मध्ये दिसते तसंच करण्यासाठी जातात. मोबाईल जशाप्रकारे बोलतो मुले तशाच प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करायला लागतात अशा कृत्याने पालकाला देखील कुतूहल वाटते.

या मोबाईलमुळे अनेक बालकांचे बालपण गमवत चालले आहे. बालपण काय असतं हे त्यांना आता कळत देखील नाही कारण लहान मुले हे मोठ्या प्रमाणे वागत आहे. आता कळत नाही की मुले लहान आहेत की मोठे, मुले अभ्यासात लक्ष देत नाही त्यामुळे मागे पडत आहेत. मागे पडल्यामुळे त्यांना समोर शिक्षक काय शिकवतात हे देखील काही कळत नाही म्हणून असेच मागे पडतात आणि अभ्यास करणं सोडून देतात आणि फक्त मोबाईल पडेल आकर्षित होतात. मुले जास्त वेळ मोबाईल बघत बसले तर त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. मोबाईल मुळे मुलांना आता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण मुलांच्या शरीरावर आणि मनावर अनेक वाईट परिणाम होताना दिसत आहे. लहान मुलांना हे कळतही नाही की समोरचा व्यक्ती त्यांना काय बोलत आहे आणि आपण त्यांना काय उत्तर दिले पाहिजे हे ज्ञान त्यांना येत नाही कारण ते फक्त मोबाईल बघतात आज पास काय चाललं आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं.

मुलांना मोबाईल मुळे ऐकण्यात देखील समस्या निर्माण होऊ लागले आहेत कारण मोबाईल वापरताना मुले हे डफोन चा वापर करतात. लहान मुलांच्या कानातील खड्डे हे खूप नाजूक असतात त्यामुळे त्यांच्यावर खूप जलद गतीने परिणाम होतो. हेडफोनच्या अतिवापराने असे लक्षणे लवकर दिसतात. त्यामुळे मुलांना कधीच हेडफोन लावून मोबाईल देऊ नये. शक्यतो जेवढा तुम्ही मोबाईल तुमच्या मुलांपासून दूर ठेवतात तेवढेच उत्तम, कारण मोबाईल सतत पाहिल्याने देखील डोळ्यांना त्रास होतो मोबाईलच्या अतिवापराने जो मोबाईल मधील प्रकाश आहेत तो थेट तुमच्या मुलाच्या डोळ्यावर येऊन पडतो आणि मुलांना एवढे कळत नाही की आपण मोबाईल पाहताना थोडे लांब मोबाईल ठेवून पाहावे. तो मोबाईल पाहताना खूप जवळ घेऊन पाहतात. त्यामुळे तुमच्या मुलाच्या डोळ्यावर वाईट परिणाम होताना दिसत आहेत. मुले डोळे सतत उघडझाप करतात, मुलांच्या डोळ्यातून सतत पाणी येताना दिसते, मुलांचे सतत डोके दुखू लागते, त्याचप्रमाणे मुले हे मोबाईल न दिल्याने खूप चिडचिड करायला लागतात मोबाईलच्या अतिवापराने होतात.MOBAIL PARINAM

पहिल्या काळात मुले खूप हुशार होते त्यांना सामाजिक ज्ञान होते तसेच ते मुले अभ्यास करून इतर दुसरे काम देखील करायचे कारण त्याकाळी खूप पैसे नसायचे त्यामुळे मुले अधिक हुशार होत गेले परंतु जेव्हापासून हा स्मार्टफोन आला तेव्हापासून मुले हे फक्त मोबाईलच्या आहारी गेले आहे जे मुले हुशार आहेत जे मुले मोबाईल पाहत नाहीत तेच मुले हुशार आहेत आणि तेच मुले पुढे जाऊन प्रगती करतील. मोबाईल हा प्रमाणात आणि गरजे इतकाच पहावा. अतिवापराने अधिक नुकसान होते. मुले हे मोबाईल मुळे अधिकच हुशार होत आहेत मुलांना जे नाही ते लवकरच कळत आहे. मुलांना आपले करिअर घडवायचे असते हे त्यांना कळत नाही मुले आपले स्वप्न काही आहेत हे देखील विसरून जातात मोबाईलच्या नादात मुले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गावी तर जातात परंतु हातात मोबाईल असल्यामुळे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहते ते पूर्ण होत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप जिद्द लागते. त्यासाठी मोबाईल हा स्वतःपासून दूर ठेवा लागतो मोबाईल आपल्या उपयोगी पडला पाहिजे आपल्याला हवी ती माहिती मोबाईल मधून घेता आली पाहिजे आपल्याला त्याचा वापर व्यवस्थित प्रमाणे करता आला पाहिजे आता इकडे भलतच नाही घडत आहे मोबाईलच आपला वापर करून घेत आहे. आपण मोबाईलवर राज केले पाहिजे परंतु मोबाईलच आपल्यावर राज करत आहे. मोबाईल आपल्यावर हुकूमत गाजवत आहे. असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जी मोठी मोठी व्यक्ती होऊन गेली त्यांच्या जवळ देखील मोबाईल असेलच ना ते का मोबाइल पाहत नाहीत त्यांच्याजवळ पण त्या मोबाईल मध्ये आहे जे तुमच्या मोबाईल मध्ये आहे. परंतु ते माणसं स्वतःवर कंट्रोल करतात स्वतःला मोबाईल पासून लांब ठेवतात आणि आपला मेन पॉइंट काय आहे याकडे लक्ष केंद्रित करतात आपले स्वप्न ते पूर्ण करतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अशाच व्यक्तींकडे पाहून आपण आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजे आपल्या हाताचा मोबाईल लांब ठेवला पाहिजे आपल्याला हवी तेवढीच माहिती मोबाईल मधून घेतली पाहिजे मोबाईलचा वापर करणे योग्य आहे.MOBAIL PARINAM

Leave a Comment