Maharashtra sheti: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र मध्ये शेती कोण कोणती केली जाते. शेतीचे प्रकार किती आहेत, महाराष्ट्रात शेती ही सर्वात जास्त कशाची केली जाते. कोणती शेती ही प्रमुख शेती म्हणून मानली जाते त्याचबरोबर महाराष्ट्रात कोणत्या शेतीचे उत्पन्न सर्वात जास्त येते आणि शेती ही कोणत्या कारणामुळे केली जाते शेती करण्यामागे फायदे काय आहेत. याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो शेती हा असा व्यवसाय आहे जो की पशुपालन व्यवसायासोबत केली जाते. पशुपालन करण्यासाठी शेती करावी लागते त्याचबरोबर अनेक प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी शेती ही महत्त्वाची आहे. जगासाठी शेती हा एक अन्न उत्पादनाचा शोध आहे त्याचबरोबर व्यवसायासाठी शेती हा जोडधंदा व्यवसायिक शेती आणि स्थानिक उत्पादन बरेच लोक अवलंबून राहतात.
शेतीच्या प्रकारात शेती ही ऊस मळ्याची शेती, भात शेती, जिरायती शेती, सेंद्रिय शेती, बागायती शेती, रासायनिक शेती, पशु प्रधान शेती, मत्स्य शेती या प्रकारच्या शेती महाराष्ट्रमध्ये केल्या जातात. या शेतीमध्ये विविधता आढळून येते. अनेक ठिकाणी अनेकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रामुख्याने शेती केली जाते त्याचबरोबर हे काही शेतीचे प्रकार आहेत ते म्हणजे सघन शेती, निर्वाह शेती, व्यवसायिक शेती, स्थलांतरित शेती, विस्तृत शेती,. वृक्षारोपण शेती आणि मिश्र शेती या शेतीचा समावेश होतो.
महाराष्ट्र मध्ये ग्रामीण भागात राहणारे नागरिक हे 82 टक्के शेतीवर अवलंबून असतात. राज्यात अन्नधान्याचे पिके आणि फळ पिके हे दोन्ही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. फळांच्या पिकांमध्ये आंबा, चिकू द्राक्ष पेरू फणस कलिंगड केळी पपई खरबूज अननस रामफळ सिताफळ मोसंबी जांभळ नारळ काजू इत्यादी पिके घेतली जातात. आणि अन्नधान्यांमध्ये गहू ज्वारी बाजरी मका तांदूळ अनेक प्रकारच्या डाळी यामध्ये मूग मटकी मुसळ हरभरा तूर उडीद इत्यादी आहेत त्याचबरोबर नगदी पिके ही घेतली जातात यामध्ये ऊस हळद कापूस मिरची लसुन कांदा बटाटा टोमॅटो वांगे इतर पालेभाज्या रेशम भुईमूग या पिकांचा समावेश होतो.
महाराष्ट्रामध्ये कोणते ठिकाण कुठल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे
प्रमुख पिके व प्रसिद्ध ठिकाण:
- सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, हे ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे.
- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, हे तांदूळ यासाठी प्रसिद्ध आहे.
- अहमदनगर, पुणे, हे बाजरी यासाठी प्रसिद्ध आहे.
- नाशिक, नागपूर हे गव्हासाठी प्रसिद्ध आहे.
- अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, हे उसासाठी प्रसिद्ध आहे.
- , धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, हे कापसासाठी प्रसिद्ध आहे.
- कोल्हापूर, सांगली, सातारा, हे तंबाखू साठी प्रसिद्ध आहे.
- निफाड व लासलगाव(नाशिक), जुन्नर व फुरसुंगी (पुणे) हे कांदा लसूण यासाठी प्रसिद्ध आहे.
- सांगली, सातारा हळदीसाठी प्रसिद्ध आहे.
शेतीचे दोन मुख्य प्रकार पडतात आधुनिक शेती, पारंपारिक शेती
आधुनिक शेती पद्धत: ही शेती करत असताना अनेक प्रकारचे अवजारे यामध्ये नांगरणी पेरणी, कापणे त्याचबरोबर इतर शेतीचे सर्व कामेही आधुनिक तंत्राच्या माध्यमातून केली जातात. याला उच्च शेती म्हटले जाते म्हणजेच आधुनिक शेती असे म्हटले जाते ही शेती भरपूर शेत असल्यास आणि मोठमोठे उत्पन्न घेताना केली जाते. अन्नधान्य संपूर्ण जगाला पुरावे अन्नधान्याची मागणी पूर्ण व्हावी म्हणून आधुनिक शेतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. परंतु, सध्या शेती ही व्यवसायिक दृष्ट्या रासायनिक खत आणि कीटकनाशकांच्या वाढत्या प्रभावामुळे निसर्गामध्ये असलेले साधन संपत्ती या घटकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असलेला दिसून येत आहे. आधुनिक शेतीमुळे जमिनीचा त्याचबरोबर जमिनीमधील अन्नद्रव्याचा ह्यास होत आहे. माती आणि पाण्याचे प्रदूषण या आधुनिक शेतीमुळे होत आहे. जमिनीमध्ये असलेले शेतीसाठी उपयुक्त जिवाणू यांचा रसायनामुळे नाश होत आहे.
पारंपारिक शेती पद्धत: ही शेती सुरुवातीच्या काळात केली जात होती. सध्या शेती व्यवसायामध्ये शेती ही निसर्गातील विविध घटकावर आधारलेली आहे. पारंपारिक शेती ही सेंद्रिय मूलतत्त्वावर शेतात वापरण्यात येणारे सेंद्रिय पदार्थ शेती तयार केले जातात. सेंद्रिय खत तयार करून शेतात टाकले जाते या सेंद्रिय खतासाठी कचरा पालापाचोळा जनावरांचे मलमूत्र या सर्व एकत्र करून ते कुजून सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरले जाते. या सेंद्रिय पदार्थामुळे शेतामधील पिकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळते. या शेतीमुळे जमिनीच किंवा वातावरणाच प्रदूषण होत नाही तर सेंद्रिय शेती केल्यामुळे प्रदूषण होणार नाही. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. ही सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. ज्या पिकाची शेती करायची असेल त्या पिकाची योग्य वेळेस पेरणी किंवा लागवड केली तर पिके चांगल्या प्रकारे येते. शेतीसाठी खत तयार करण्यासाठी तुम्ही शेतामध्ये हिरवळीच्या पिकाची पेरणी करून ती जमिनीत गाडली तर त्याची विघटन होऊन त्या जागेवर पिके मोठ्या प्रमाणात येते हा एक उत्तम मार्ग आहे सेंद्रिय शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी. सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते त्याचबरोबर पिकावरील कीड आणि रोगापासून पिकाचे संरक्षण देखील होते.
शेतात पीक घेण्याच्या पद्धती
जिरायत आणि बागायत या दोन पीक घेण्याचे प्रकार आहेत. जी शेती पावसाच्या पाण्यावर आधारित असते त्या शेतीला जिरायत शेती म्हणतात या शेतीला पाण्याची उपलब्धता नसते. पाऊस आला तरच या शेतीतील पीक चांगल्या प्रकारे येते. लागवडीच्या वेळेस पावसाने दगा दिला तर जिरायत शेतीला लागवड करू नये काहीच उपयोग होत नाही. बहुतेक शेतकरी जिरायत शेतीकडे भर घालतात शेती पद्धतीचा वापर करतात. शेती करण्यासाठी शेतकरी थोडासा उतार असलेली जमीन आणि संतुलित ओलावा व सुपीक जमीन जमीन खूप कोरडी किंवा ओली नाही अशा जमिनीचा वापर शेतकरी करतात. ही शेती करण्यासाठी उबदार असे हवामान आणि योग्य तंत्रसामग्री, मानवी संसाधने आवश्यक आहे जिरायत शेती ही आपल्याला प्रमुख अन्नधान्य देते त्याचबरोबर प्राण्यांसाठी तेल आणि चारा तयार करण्यास मदत करते. ही जिरायत शेती वार्षिक उत्पादन तयार करते. वार्षिक उत्पादन म्हणजे धन्य पेरणीपासून ते काढणीपर्यंत या उत्पादनाला वार्षिक उत्पादन म्हणतात उपयुक्त आहे.
त्याचबरोबर ज्या शेतीला पाण्याची उपलब्धता असते आणि जिथे सिंचन द्वारे पाणी शेतीला दिले जाते. ही शेती पावसाच्या भरोशावर राहत नाही. पाऊस नाही आला तरी पाणी देऊन या शेतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे येते. बागायती पिकामध्ये चिंच लागवड करून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवतात.
जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया चिंच लागवडीबद्दल माहिती
चिंच लागवड ही कुठल्याही जमिनीत येते त्यासाठी ठराविक जमीन निवडणे महत्त्वाचे नसते. चिंचाच्या लागवडीसाठी मूलभूत प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. चिंच लागवडीनंतर पाच सहा वर्ष पाण्याची व्यवस्था करावी लागते. लागवड करताना त्यासाठी जमीन तयार करणे आवश्यक आहे. चिंचेच्या झाडाला कुठल्याही प्रकारचा रोग किंवा कीड लागत नाही. चिंचेच्या झाडाला फवारणीचे किंवा खताची ही आवश्यकता भासत नाही. चिंचेचे उत्पादन सुरू झाल्यानंतर दरवर्षी शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते हे उत्पादन घरी बसून पन्नास ते साठ हजार रुपये सहज मिळते. चिंचेच्या लागवडीनंतर तुम्ही शेतामध्ये आंतरपीक ही घेऊ शकता. यातून तुम्हाला डबल नफा मिळतो.
तुम्ही लागवड कोणत्या पद्धतीने करणार आहात यावर जमीन तयार करणे आधारित आहे. लावणारा असाल तर त्यासाठी खड्डे खांदावे लागतील हे खड्डे पाच फूट अंतरावर असावे. चिंच या लागवडीतून उत्पादन हे दरवर्षी भरपूर प्रमाणात येतो. चिंचाच्या झाडाला फळ हे पाच वर्षांनी लागत. चिंचाच्या झाडाची छाटणी करावी लागत नाही. चिंचाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकरी चिंचेच्या लागवडीवर आणि व्यवसाय करण्यावर अधिक भर देतात. चिंच हे खायला बहुतेक लोकांना आवडते, चिंचापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर चिंच खाद्यपदार्थांमध्येही टाकून आवडीने खाल्ली जाते. चिंच ही भेळ पाणीपुरी रगडा कचोरी यासारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते.Maharashtra sheti