Batata lagavada: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की बटाट्याचे उत्पादन कशाप्रकारे घेतले जाते आणि हे उत्पादन कोणत्या महिन्यामध्ये घेण्यात येते, उत्पादन घेण्यासाठी कोणते वातावरण अनुकूल आहे, बटाट्याचे उत्पादन किती दिवसांमध्ये येते, आणि बटाटे वाढण्यास किती कालावधी जातो, हे आपण सर्व या बातमीमध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया लागवडीबद्दल संपूर्ण माहिती
मित्रांनो, चे पीक हे अत्यंत कमी कालावधीत आणि इतर पिकांपेक्षाही दुप्पट येते. हे पीक घेण्यासाठी खूपच सोपे आणि फायद्याचे आहे. परंतु पिकाची लागवड केल्यापासून योग्य काळजी घेतले तर हे पीक खूपच जास्त प्रमाणात येते. बटाट्याच्या पिकाला अनुकूल असे वातावरण असायला पाहिजे. म्हणजे पीक लागवडीच्या वेळेस उष्ण वातावरण आणि बटाटे पोसण्याच्या वेळेस थंड वातावरण पिकाला हो पोषक असते. पिकाचे वाढ होत असताना सरासरी 15 ते 20 अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते. आणि बटाट्याला अंकुर उटण्याच्या काळात 44 अंश सेल्सिअस तापमान पिकाला पोषक ठरू शकते. बटाटे पोसण्याच्या काळात 21°c चे तापमान अनुकूल असते. जरा बटाटे पोसण्याच्या काळात तापमानात बदल होऊन तापमान हे 29 अंश पर्यंत पोहोचले बटाटे तयार होत नाहीत.
बटाट्याच्या उत्पादनासाठी योग्य वेळ आणि बटाट्याची निवड
बटाटा लागवड करताना बटाटे हे वेगवेगळ्या आकाराचे आणि वजनदार असे लागवडीसाठी वापरावेत जेणेकरून उत्पादन चांगल्या प्रकारे येईल.
लागवडीसाठी बटाटे हे साधारणपणे मध्यम आकाराचे 25 ते 55 मी किंवा 25 ते ७५ ग्रॅम वजनाचे बटाटे वापरावेत.
हे पीक रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या काळात घेतले जाते.
बटाटा लागवडीसाठी बटाटे हे नवीन आलेले वापरू नये, लागवडीसाठी बटाटे हे साठवणूक केल्यानंतर काही काळानंतर वापरावे, कारण साठवलेले बटाटे यांना काही कालांतराने फुटतात. आणि हे बटाटे लावले तर उत्पादन व्यवस्थित येते.
जर बटाट्याचे वजन हे 30 ते 35 ग्रॅम वजनापेक्षा जास्त असेल तर त्याची दोन किंवा चार भागांमध्ये समान कापणी करावी. कापणी करता वेळेस बटाट्यांच्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी.Batata lagavada news
बटाट्यांची लागवड कशी करावी
- बटाटे लागवडीसाठी कोफरी ज्योती,कोफरी सूर्या,कोफरी लवकर,कोफरी सिंदुरी, या प्रकारच्या जातींची निवड करावी. जमीन ही 20 ते 25 सेमी खोल नांगरून भुसभुशीत करावी त्यानंतर रोटा वेटर च्या साह्याने ढेकळे फोडून जमीन सर्व समान करावी.
- लागवड करताना लागवडीसाठी सरी वरंबा ही पद्धत वापरावी अंतराच्या सऱ्या पाडाव्यात त्यानंतर त्या सऱ्यांमध्ये खत घालून वीस सेमी अंतरावर बटाटे ठेवून मातीने झाकून घ्यावे. लागवड झाल्यानंतर हलकेसे पाणी सोडावे.
- एक एकर शेतीच्या लागवडीसाठी पंधरा ते वीस क्विंटल बटाटे पुरेसे होतात.
खत व्यवस्थापन
- लागवड करण्या अगोदर म्हणजेच शेतामध्ये सऱ्या पाडता वेळेस एक हेक्टर शेतामध्ये 15 ते 20 टन चुरलेले शेणखत जमिनीत मिसळावे लागते. आणि त्या शेणखतामध्ये झिंक सल्फेट 20 किलो प्रती हेक्टर प्रमाणे मिसळावे.
- बटाट्याच्या पिकास हेक्टरी नत्र 150 स्फुरद 60 किलो व पालाश 120 किलो या प्रमाणामध्ये रासायनिक खत द्यावा लागते अशी शिफारस केली जाते. लागवडी वेळेस नत्र खतांच्या मध्ये अर्धी मात्रा स्फुरद व पालशाची संपूर्ण मात्रा द्यावी त्यानंतर उरलेले नत्र खत यांची मात्रा लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावे.
उत्पादनाला पाण्याची व्यवस्थापना
बटाटा पिकाची लागवड पूर्ण झाल्यानंतर लगेचच हलके पाणी द्यावे. बटाट्यांना कोमे येऊन ते फुगून त्याचे टोके वाढवून लागल्या आणि बटाटे पोसण्याच्या काळात 6 ते 7 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे लागते. पिकाची योग्य वाढ पूर्ण झाली की पाणी देणे कमी करावे लागते जेणेकरून पिकाची नासाडी होऊ नये.
बटाटा पिकाची अंतर मशागत
बटाटा पिकाला खुरपणीची आवश्यकता लागते आणि त्याचबरोबर मातीची भर देण्याची ही गरज लागते म्हणून पिकाला तीन ते चार वेळा कॉल पण करून जमीन ही भुसभुशीत ठेवावी. आणि खताचा दुसरा डोस देता वेळेस झाडांना मातीचा भर द्यावा त्यामुळे बटाटे चांगले पोसतात व उत्पादनात वाढ देखील होते.
बटाटे वाढण्यासाठी किती वेळ चा कालावधी जातो
बटाटे उगवण्याचा कालावधी बहुतेक जातींचा वेगवेगळ्या असतो. परंतु काही जातींमध्ये 90 ते 120 दिवसाचा असतो. बटाटे हे पहिल्या हंगामात लावले तर त्याच्या अंदाजाने 60 ते 80 दिवसात बटाटे येतात. मध्यम हंगामी चे पीक हे 80 ते 100 दिवसात येतात आणि उशिरा बटाट्याचे उत्पादन घेतले तर बटाटे वाढण्यास 100 ते 130 दिवस लागतात. अशा प्रकारे कालावधी जातो बटाट्याच्या पिकांना येण्यासाठी. Batata lagavada mahiti
बटाटा झाडाची कापणी कधी करतात
बटाटा पिकांची छाटणी लवकरच केली जाते. छाटणी करण्यास उशीर झाला तर पिकाची वाढ होणार नाही, आणि त्याचबरोबर बटाट्यांचा आकार आहे मोठा होणार नाही म्हणजेच वाढणार नाही. छाटणी करण्यास उशीर झाला तर उत्पादनाचे तुमची पायरी घसरली असं समजा. पिकाची ही छाटणी करणे खूपच गरजेचे आहे कारण त्यामुळे खूपच नुकसान होते. बटाट्याच्या पिकाचे रोप ज्यावेळेस सहा ते आठ इंच उंच जाते त्यावेळेस केले जाते त्यानंतर अंकुर फुटल्यानंतर काही आठवड्यांनी झाडांची ऊर्जा ही झाड वाढण्याऐवजी बटाटे पोसण्यास मदत करते.
बटाटा काढणे
बटाटा हा काढणीचा काळ हंगामानुसार बदलत असतो. खरीप हंगाम मध्ये केलेले बटाट्याचे उत्पादन हे नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये काढण्यात येते. तर रब्बी हंगामातील बटाटे मार्च ते एप्रिलमध्ये काढण्यात येते. बटाटा काढताना योग्य काळ निवडणे खूपच गरजेचे आहे. बटाटा पूर्णपणे पिकल्यानंतर तो जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात झाल्यावर काढणे करावी. खूप महत्त्वाचं म्हणजे काढणे करता वेळेस कोरडे हवामानाची गरज असते. बटाटा काढताना नागरण,कोळप,कुदळ किंवा बटाटा काढण्याचे यंत्र वापरले जाते. बटाटा काढणे झाल्यानंतर लगेचच शेतामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत घालावे.Batata lagavada marathi mahiti
बटाट्याचे उत्पादन बहुतेक जिल्ह्यामध्ये घेतले जाते. बटाटे हे महत्त्वपूर्ण पोषक अन्नघटकापैकी एक आहे बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, कर्बो हायड्रेट, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे आहेत. बटाटा हे अन्नपदार्थ बहुतेक भाज्यांमध्ये वापरले जातात बटाट्याशिवाय कोणतीच भाजी पूर्ण होत नाही असे मानले जाते. वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे डिश तयार केले जाते. विविध पदार्थांमध्ये वापरला जाणारा बटाटा खूपच पोषक असतो. या बटाट्याची काढणे हे साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात केली जाते. काढणे योग्य पद्धतीने केल्यानंतर उत्पादनात वाढ होते आणि बटाटे चांगल्या दर्जाचे येतात. आणि चांगल्या दर्जाच्या बटाट्यांनाही चांगल्या प्रकारे भाऊही मिळतो.
बटाटा प्रतवारी
बटाट्याची काढणे केल्यानंतर बटाट्याची प्रतवारी करणे अत्यंत आवश्यक असते. प्रतवारी मध्ये बटाट्यांचा आकार त्यांचे वजन रंग आणि गुणवत्ता यानुसार वर्गीकरण केले जाते. बटाटे मोठ्या, माध्यम, आणि लहान आकाराच्या बटाट्यांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे आणि खराब दर्जाचे बटाटे त्यांचेही वर्गीकरण केले जाते. खराब बटाटे बाजूला काढले जातात. त्या बटाट्यांना योग्य भाव मिळत नाही.Batata lagavada
बटाट्यांचे प्रतवारी चे महत्व
बटाटा हे पीक भारतातील एक महत्त्वपूर्ण पिक मानले जाते.प्रतवारीमुळे बटाट्यांचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानुसार बटाट्यांची विक्री होते. आणि बटाट्यांचा वापरही प्रतवारी नुसार केला जातो. कारण खराब गुणवत्तेचे बटाटे हे सुरुवातीला वापरण्यात येते आणि चांगले गुणवत्तेचे बटाटे नंतर वापरण्यात येते. प्रतवारीमुळे बटाट्यांचे गुणवत्तेचे रक्षण केले जाते. त्यामुळे बटाट्यांची नुकसान खूप कमी होते. त्याचबरोबर बटाट्याची वाहतूक आणि साठवणूक करणे सोपी जाते.
बटाटे साठवण्याची पद्धत
बटाटे हे शीतगृहामध्ये साठवले तर बटाट्यांची उगवण क्षमता टिकून राहते.
बटाट्यांचा पुरवठा जास्त काळ टिकून राहतो.
शीतगृहामध्ये 1.5-5 अंश सेल्सिअस तापमान आणि 85 टक्के सापेक्ष आद्रता असल्यास 6 ते 12 महिन्यापर्यंत बटाटे साठवून ठेवले जाते.
बटाट्यांचे कोंब 1.5 अंश सेल्सिअस तापमानात 1 वर्षापेक्षा जास्त काळ पाच अंश सेल्सिअस तापमानात 30 आठवड्यापर्यंत बटाटे सुरक्षित राहतात.
हे बटाटे शीतग्रहातून बाहेर काढल्यानंतर काही काळापर्यंत राहतात. या पद्धतीमध्ये साठवलेले बटाटे हे पाच टक्के पेक्षा जास्त बटाटे वाया जात नाहीत.Batata lagavada