Aavala Lagavd Mahiti: आवळा लागवड आणि आवळा खाण्याचे फायदे

Aavala Lagavd Mahiti: आवळा लागवड आणि आवळा खाण्याचे फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आवळा खाण्याचे फायदे आणि आवळ्याची लागवड कशा पद्धतीने करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आवळा लागवड कशा पद्धतीने करायची. आवळा लागवड करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याचबरोबर आवळ्याचे उत्पादन कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त येते व आवळा पिकाचे कोणत्या ठिकाणी उगम स्थान आहे आवळा पिकाचे उत्पादन कशाप्रकारे होते आवळा पिकासाठी योग्य वातावरण कोणते आहे आवळा पिकाला कोणत्या प्रकारची जमीन गरजेचे असते आवळा पिकाच्या सुधारित जाती कोणते आहेत आवळा हॅपी कोणत्या हंगामामध्ये घेतले जाते

त्याचबरोबर आवळा पिकाच्या लागवडीसाठी अंतर हे किती ठेवावे लागते पीक आल्यानंतर किती दिवसांनी आवळ्याच्या झाडाची छाटणी करावी लागते पिकासाठी खत व्यवस्थापना कधी आणि कशाप्रकारे करावी लागते त्याचबरोबर आवळा पिकासाठी पाण्याची व्यवस्थापना कशी करावी लागते आणि किती प्रमाणात पिकांना पाणी देणे आवश्यक आहे त्याचबरोबर आवळा पिकामध्ये कुठले आंतरपीक घेतले जाते का व ते कोणत्या प्रकारचे असतात आणि किती दिवसांनी घ्यावे लागते आवळा पिकाला तनयंत्रणा किंवा पिकावर कुठली कीड होऊ नये म्हणून कोणती यंत्रणा सुरू ठेवावी लागते आवळ्याच्या पिकांना आवळे आल्यानंतर त्याची कारणे किती दिवसांनी करावी व कशाप्रकारे करावी त्यानंतर पिकाची उत्पादन चांगले आल्यानंतर त्याची विक्री कोठे करावी लागते व कशाप्रकारे करावी लागते आणि आवळाचे उत्पन्न साठवण्यासाठी तयारी करणे. इत्यादी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

आवळ्याचे पीक हे खूपच काटक असते या आवळ्याच्या पिकाला जास्त काळजी घेण्याची गरज नसते. एकदा पिकाची पूर्ण निद्रांनी केली आणि खत व्यवस्थित प्रमाणे टायमावर टाकले तर या पिकाला जास्त काही करण्याची गरज भासत नाही. या आवळ्याच्या फळ झाडापासून जास्त प्रमाणात उत्पादन मिळते. आवळा हे पीक आवळा हे पीक पानझटी नसून सदाहरित झाड आहे. या झाडांची उंची 20 ते 22 मीटर वाढते त्याचबरोबर या आवळ्याच्या झाडाची फळे चवीला तुरट आणि आंबट असतात. आवळ्याच्या आवळ्याच्या झाडापासून अनेक औषधी बनवल्या जातात त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये या आवळ्याच्या फळ झाड लागवडीला वाव आहे. आणि उत्तर प्रदेशामध्ये आवळ्याची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये आवळ्याची लागवड ही कोरडवाहू भागात हलक्या मुरमाड जमिनीत आवळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कारण त्या भागांमध्ये आवळ्याची लागवड चांगल्या प्रकारे येते.Aavala Lagavd Mahiti

आवळा या फळ झाडाचे दक्षिण पूर्व आशियातील मध्ये आणि दक्षिण भारतात उगम स्थान आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडील श्रीलंकेत पर्यंत या आवळ्याच्या झाडाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येते. त्याचबरोबर भारतामध्ये समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ चांगल्या प्रमाणात होते. आवळ्याच्या फळांमध्ये क जीवनसत्व मूलभूत प्रमाणात असतात. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षाही 20 पटाने क जीवनसत्व असतात.

आवळ्याच्या फळापासून मुरांबा श्वास कॅन्डी वाळलेल्या चकत्या आवळ काठी मुळावळा चावण प्राश आवळा सुपारी जेली लोणचे ट्रॉफी पावडर इत्यादी पदार्थ आवळ्यापासून बनवले जातात. आवळा जरी वाढवला तरी त्या आवळ्यामध्ये क जीवनसत्व हे नष्ट होत नाही. शरीरामधील क जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी कृत्रिम पद्धतीने क जीवनसत्व घेण्यापेक्षा आवळ्याच्या पावडरचा उपयोग केल्यास क जीवनसत्व भरून निघते आवळ्याच्या फळांमध्ये गुणकारी औषध धर्म असतात. ताप भगवान किंवा मधुमेह या आजारावर आवळा हा गुणकारी औषध आहे त्याचबरोबर आवळ्याचे तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणधर्म आहे आवळा खाल्ल्यामुळे पोटाचा विकार कमी होऊन पचनक्रियेमध्ये सुधारणा येते

आवळा लागवडीसाठी शेत अशाप्रकारे तयार करावे.

आवळ्याची लागवड करण्यापूर्वी जमीन तयार असणे आवश्यक आहे. सर्व आधी लागवड करण्यासाठी चांगली नांगरणी करून घ्यावी. रोटावेटर चा वापर करावा. रोपे लावण्यासाठी चौकोनी 1 मीटर खोल खड्डे खांदून बियाणे केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस ते खड्डे तसेच तापवण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये ठेवावेत. दोन रोपांमधील अंतर 4.5 मीटर इतके असावे.

आवळ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

बनारसी कृष्णा या दोन्ही लवकर वाढणाऱ्या जाती आहेत या जातींचे सरासरी उत्पन्न हे प्रत्येक झाडाला 120 किलो आहे. याव्यतिरिक्त इतर काही जाती आहेत ज्यांचे प्रत्येक झाडाचे उत्पादन हे या झाडांच्या जातीपासून अधिक आहेत त्या म्हणजे जाम, कँडी, जेली इत्यादी बनवण्यासाठी वापरल्या जातात. NA-9,NA-10,NA-7 या तीन प्रमुख जाती आहेत.

सिंचन व खत व्यवस्थापना अशा प्रकारे करा

सिंचन: झाडांना अशाप्रकारे पाणी दिले पाहिजे ते म्हणजे उन्हाळी हंगामात पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे लागतात तर पावसाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची गरज नसते तर हिवाळ्यात प्रत्येक झाडांना दरम्यान 25 ते 30 लिटर पाणी हे रोजचे द्यावे लागतात. त्याच बरोबर ज्यावेळेस झाडांना फळ येण्यास सुरुवात होती तेव्हा सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे.

खत: जमीन तयार करताना रोटावेटर च्या मदतीने गायीचे शेण शेतात चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे त्याचबरोबर वर्षातून एकदा तरी शंभर ग्रॅम नायट्रोजन 100 ग्रॅम पोटॅशियम 50 ग्रॅम फॉस्फरस हे रासायनिक खते प्रत्येक झाडाला घालावे त्याचबरोबर वर्षानुवर्ष हे खतांचे प्रमाण वाढावे.

आवळा पिकाची छाटणी अशाप्रकारे करा

सर्वात आधी आवळ्याच्या झाडाला वळण द्यावे लागतात. कारण आवळ्याचे लाकूड हे अतिशय ठिसूळ असते म्हणून आवळ्याच्या फांद्या ह्या फळाच्या ओझाने वाहून मोडतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात झाडाचा सांगडा बळकट करण्यासाठी आणि झाडांची योग्य वाढ होण्यासाठी आवळ्याच्या झाडांना वळण देणे अत्यंत आवश्यक आहे. आवळ्याचे झाड हे जमिनीपासून एक मीटर उंचीवर पाच ते सहा जोमदार फांद्या आणि योग्य अंतरावर चारही दिशांना विखरलेल्या स्थितीमध्ये वाढाव्यात अशा स्थितीमध्ये आवळ्याच्या झाडाला आकारात ठेवावे आवळ्याच्या झाडाला एक मीटर च्या खाली येणारी फूट फांदी काढून टाकावे. फळांचा हंगाम संपल्यानंतर रोबोट कमजोर वाळलेल्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.(Aavala Lagavd Mahiti Marathi Mandun)

या शेतीच्या लागवडी मधून उत्पन्न एवढ्या प्रमाणात मिळेल

तुम्ही ही शेती जर एक एकर मध्ये करण्याचा विचार असेल तर तुम्हाला याची सरासरी खर्च 25 ते 30 हजार रुपये प्रति एकर मध्ये येईल आणि याचे उत्पादन हे वार्षिक 50 क्विंटल पेक्षाही जास्त आवळ्याचे उत्पादन मिळेल. या उत्पन्नातून तुम्ही एक एकर मध्ये एका वर्षात एक ते दीड लाख रुपये एवढी कमाई करू शकतात.

आवळ्याच्या शेतीमध्ये आंतरपीक घेता येते हे आवळ्याची लागवड ही हलक्या आणि मध्यम जमिनीत केली जाते त्यामुळे अशा जमिनीमध्ये होत आणि कस टिकवण्यासाठी चिवळी उडीद मूग वटाणा हरभरा इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेतली जातात.

आवळा शरीरासाठी खूपच उपयुक्त असणारा घटक आहे

रोज सकाळी रिकामे पोटी आवळ्याचे रस पिल्यानंतर शरीर है निरोगी बनते व जीवनशैलीसाठी हा एक मौल्यवान घटक आहे, या आवळ्यामध्ये जीवनसत्त्वे खनिजे आणि त्याचबरोबर आवळ्याला अँटिऑक्साइडचा एक उत्तम शोध आहे असे मानले जाते. त्याचबरोबर आवळ्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. आणि जळजळ कमी करण्यास आवळा फायदे मन आहे त्याचबरोबर पचन संस्थेत सुधार होते. केस गळण्यापासून थांबतात व वाढण्यास सुरुवात होतात त्वचेमध्ये चांगला बदल दिसून येतो. वजन कमी करण्यास देखील फायदेमंद आहे आवळ्यामध्ये उच्च चरबी भरणे हा गुणधर्म असल्याचा दावा केला जातो ही औषधे वनस्पती पचनक्रियेसाठी गतिमान आहे आणि आरोग्य चांगले होते.

ही औषधी शरीरामध्ये चरबी साठवू देत नाही. त्याचबरोबर शरीरामध्ये असलेले विषाणू पदार्थ पुस्तक करते आणि लघवीचे प्रमाण देखील वाढवते. खारवट , चोपण असलेले जमीन जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारण्यासाठी व त्याची लागवड करून हे पीक फुलावर येण्यापूर्वीच जमिनीमध्ये हिरवळीचे खत म्हणून काढून टाकावे. त्याचबरोबर त्यांना चा योग्य वेळी बंदोबस्त न केल्यास आवळ्याच्या पिकाची वाढ आणि उत्पादन यावर थेट परिणाम होतो आणि उत्पादनात घट दिसून येते.

आवळ्याच्या पिकाची साठवण आणि पिकवण्याची पद्धत

आवळ्याची काढणी झाल्यानंतर गोण पाठच्या पिशव्यात आवळे भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात. आवळे काढल्यानंतर आवळ्याच्या फळांची साठवण जास्त दिवस केली जात नाही, ही फळे जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस आठवले जातात आवळ्यांची फळ झाडावरच पक्क होतात म्हणून काढणीनंतर ही फळे पिकवण्याची आवश्यकता नसते.Aavala Lagavd Mahiti

Leave a Comment