LAHAN MULE: लहान मुले रडतात का, खाण्यासाठी रडत असलेले तर करा अशाप्रकारे शांत
नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की लहान मुले रडत असतील तर त्यांच्यावर आपण कोण कोणत्या उपायांनी त्यांना शांत करू शकतो. लहान मुले काही कारणामुळे रडतात ते कारण काय आहे ते आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. लहान मुलांना जे हवय ते न मिळाल्यामुळे किंवा त्यांना इतरांकडून त्रास झाल्यामुळे मुले रडतात. तर अशा रडणाऱ्या मुलांना शांत कसे ठेवायचे त्याचबरोबर ते रडू नये म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे की नाही आणि घालवला तर इतर कशा प्रकारे त्यांच्यासोबत आपण खेळले पाहिजे या प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया
मित्रांनो काही मुले जन्मताच रडकी असतात. त्यांना काही कळत नसले तरी ते सतत रडत राहतात अशा नवजात शिशूंना रडताना पाहून आपले मन खूपच व्याकूळ होते. अशा लहान कितीही शांत केलं तरी ते शांत होत नाहीत ते चिडचिड करतात लहान जास्त का रडत असेल तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागते. काही शिशु हे थोडेफारच रडतात. त्यांना आपण सहज शांत करू शकतो. त्यांना थोडेसे खेळून ते लगेच शांत होतात. तसेच लहान मुले रडतात तर ते काही कारणांमुळे लहान मुले हे कोणत्याही कारणामुळे रडतात त्यांना चिडचिड होते ती त्यांना सहन होत नाही म्हणून ते सतत रडतात कोणतीही गोष्ट हवी असेल की लगेच रडण्यास सुरुवात करतात. लहान मुले रडायला लागली की त्यांना जी गोष्ट हवी आहे ती मिळते अशा आशेने ते मुले सतत रडतात. लहान मुलांना जेवण करणे आवडत नाही म्हणून ते जेवायचं नाव घेतलं की लगेच रडायला सुरुवात करतात. अशा वेळेस त्या मुलांना नादी लावून आपल्याला खाऊ घालावे लागते. त्या मुलांना एकदाच खाऊ घालण्यापेक्षा थोडे थोडे करून जर त्यांच्यासोबत खेळून त्यांना खाऊ घातले तर ते लगेच खातात आणि खाताना ते रडत देखील नाही.
लहान मुले आजारी पडतात ते खूप चिडचिडेन होतात त्यांना त्रास सहन होत नाही म्हणून ते रडतात अशा वेळेस त्यांना शांत करणे खूप कठीण होते त्याचबरोबर औषध पिताना देखील लहान मुले खूप रडतात. औषधाचे नाव घेतले हीच मुले रडायला लागतात औषधे पासून लांब पळतात. तर त्यांना औषध पिणे आवडत नाही म्हणून ते असे करतात. आपण त्यांना औषधाची गोडी लावली पाहिजे त्यांना औषधाला चॉकलेट चॉकलेट म्हणून त्यांना दिले पाहिजे म्हणजे जी वस्तू त्यांना आवडते ती मुले लवकर खातात. असे केल्याने मुले औषध पीतील आणि ते रडणार नाही आणि त्यांना औषधाची गोडी देखील लागेल. मग ते मुले मनाने म्हणतील की मला चॉकलेट प्यायचे म्हणजेच औषध प्यायचे.
तसेच एका सोबत अनेक लहान मुले एकत्र असतील तर ते खेळता खेळताच भांडण करतात आणि स्वतःच रडत बसतात त्या मुलांना काहीच कळत नसते तरीही ते भांडतात कारण जी वस्तू एका मुलाला हवी असते तीच त्या मुलाला हवी असते म्हणून वस्तूसाठी एक दुसऱ्याला भांडतात. अशा वेळेस त्या सर्व मुलांना शांत करून त्यांच्यासोबत आपण काही नवीनच खेळले पाहिजे जेणेकरून ते मुले शांत व्यवस्थित आणि तुमच्या सोबत चांगल्या प्रकारे खेळतील आणि भांडण ही करणार नाहीत. त्या मुलांना त्या वस्तूचा विसर पडेल आणि ते परत खेळायला लागतील.
लहान मुले जसजसे मोठे होतात तसं त्यांना कळायला सुरुवात होते आणि ते कमी करण्याऐवजी जास्त करतात. एकमेकांसोबत भांडतात, रडतात, जर भाऊ-बहीण असेल तर दोघांचे भांडण कधीही केव्हाही कसेही चालूच राहते. आणि भांडतात आणि पुन्हा रडायला सुरुवात करतात. जर दोघेही लहान असेल तर त्या दोघांना व्यवस्थित तुम्ही समजून सांगून त्यांच्या तील वाद मिटवून त्यांच्यासोबत आपण थोडा वेळ घालावा त्यांच्यासोबत काही खेळ खेळावेत. काहीजण मुले रडायला लागली कीच त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि मोबाईल देऊन पालक मोकळे होतात आणि मुले शांत बसतात आणि मोबाईल पाहण्यास सुरुवात करतात त्यांना हे नवीन काय आहे हे बघण्याची उत्सुकता लागलेली असते म्हणून ते सतत त्या मोबाईलला झटपट करत असतात त्या मोबाईल मधलं त्यांना काही कळत नसेल तरीही त्यांना त्या मोबाईलची ओढ लागलेली असते.
मोबाईल दिला की आपले मूल शांत होते. म्हणून पालक हे मूल रडायला लागलं की लगेच त्यांच्या हातात मोबाईल देतात. असं करत करत मुले मोठे होतात आणि मोबाईल सोडण्याचा नावही घेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये मुले त्या मोबाईलच्या आहारी जातात सतत मोबाईल मोबाईल करत बसतात त्यावेळेस कुठे त्या पालकांना कळते की आपण मोबाईल दिला म्हणूनच आपल्या मुलांवर ही वेळ आली. मोबाईल पाहून मुले दुसरे काही करत नाहीत सर्व काही विसरून जातात खेळ खेळणे बंद करतात खेळायला जात नाही एखादी वस्तू दुसरी नवीन करत नाहीत त्यांना फक्त मोबाईल हवा असतो आणि त्यामध्ये ते गेम्स खेळतात. सध्या मोबाईल मध्ये नवीन नवीन प्रकारचे गेम आलेले आहेत त्या गेमच्या आहारी लाखो मुले गेलेली आहेत. या मोबाईल मुळे मुले स्वतःचे बालपण विसरून जातात. हे बालपणच असतं खेळण्या खोदण्याचे त्यातच तो मोबाईल या मोबाईलने लहान मुलांचं लहानपण हिसकावून घेतला आहे. मोबाईलचा वापर हा कमी आणि काही कारणांसाठीच करावा या मोबाईलचा वापर अति होतोय आणि मुलांवर वाईट दुष्परिणाम देखील होत आहे. आपण या मोबाईलचे काही दुष्परिणाम पाहुयात.
मोबाईलचे दुष्परिणाम
मोबाईल मुळे लहान लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतोय. मोबाईल मुळे मुलांच्या डोळ्यावर मोठा परिणाम होत आहे. मोबाईल मुळे मुले इतर गोष्टी करत नाहीत फक्त मोबाईलच पाहिजे असे वेडेपण मुलांना लागते. हातात मोबाईल नसेल तरी गेम्स सारखा हात सतत हलत राहतो. दुसरं काही विचार येत नाही फक्त मोबाईल पाहिजे मोबाईल मुळे अनेकांना अंधार पण आला आहे. मोबाईल मुळे अनेकांचे एक्सीडेंट होतात. कारण मोबाईल हा चालताना देखील बघतात आणि समोर आलेली गाडी बघायची विसरून जाते. मोबाईल हा तातला सुटत नाही चालताना कुठे जाताना किंवा कुठे काम करताना हातात मोबाईल हवाय. सध्या आता लहान मुलांकडे देखील स्वतःचा मोबाईल आहे. पालक त्यांना घेऊनही देतात. अगदी भूषणाने सांगतात की माझ्या मुलाकडे मोबाईल आहे. तोच मोबाईल त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर करत आहे हे त्यांना कळत नाही. मुले घरामध्ये मिसळून राहत नाहीत. ते फक्त मोबाईलचेच ऐकतात. मोबाईलच्या अतिवापराने मुलांचे आणि इतर सर्वांचे जगणे मुश्किल केले आहे. कारण सर्वजण मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत.
लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा उपाय
लहान मुले मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे त्यांना मोबाईल पासून कसे दूर करायचे तर आपण येथे पाहणार आहोत. मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावेत वेगवेगळी माहिती द्यावी नवीन नवीन प्रयोग करण्यास सांगावे त्यांना या सर्वांमध्ये बिझी ठेवावे त्यांना मोबाईलची आठवणच येणार नाही आणि ते तुम्हाला मोबाईल मागणारे देखील नाहीत. अगदी लहान मुले ही अशा प्रकारचे खेळ खेळू शकतात तेही आवडीने परंतु तुम्हाला त्यांच्यासोबत खेळावे लागले तेव्हाच ते मुले खेळ आवडीने खेळतात. तर लहान मुलांसाठी तुम्ही घोडा घोडा किंवा बॉल बॅट चेंडू या सर्वांसोबत किंवा मुली असेल तर भांडे बसणार अशा खेळांसोबत त्यांना खेळू शकता तसेच पकडापकडी लपन छपाई असे खेळ देखील तुम्ही मुलासोबत खेळू शकता. जर मुले मोठी असतील तर त्यांच्यासोबत त्यांच्यासारखे खेळ खेळावे. त्यांना जे खेळ आवडतील म्हणजेच मुलांसोबत क्रिकेट बॅटमिंटन खो-खो कबड्डी यासारखे खेळ मोठ्या मुलांसोबत खेळू शकता. त्याच प्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत नवीन नवनवीन गेम खेळू शकता.LAHAN MULE