Fans lagvad: फणस पिकाची लागवड कशी करायची पहा संपूर्ण माहिती

Fans lagvad:  नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की फणस लागवडीविषयी संपूर्ण माहिती फणस लागवड कशी करायची आणि फणस पिकाचे उगमस्थान कोठे आहे, फणस पिकाचे महत्त्व, फणसाचा भौगोलिक प्रसार कशा पद्धतीने झाला, फणस लागवडीचे क्षेत्र कोठे आहे फणस पिकाचे उत्पादन कशाप्रकारे होते, फणस पिकासाठी योग्य हवामान कोणते आहे, फणस पिकासाठी जमीन कशाप्रकारे आवश्यक आहे, फणस पिकाच्या कोणकोणत्या सुधारले जाती आणि प्रमुख जाती आहेत, पण आज पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते फणस पीक लागवडीचे हंगाम कोणते आहे, फणस पीक लागवड करताना दोन झाडातील अंतर किती ठेवावे लागते. फणस पिकाला वळण कशाप्रकारे देतात, फणस पिकाची छाटणी कशा पद्धतीने आणि कधी केली जाते, फणस पिकाची खत व्यवस्थापना कशा पद्धतीने करावी आणि कोणत्या प्रकारचे खत वापरावे रासायनिक खताचा वापर किती प्रमाणात करावा,

फणस पीक लागवडीसाठी पाण्याची व्यवस्थापना कशा पद्धतीने केली जाते त्याचबरोबर फणस पिकाला पाणी किती आणि कधी द्यावा लागते, फणस पिकामध्ये कोणते अंतर पीक घेतले जातात, फणस पिकामधील त्यांना नियंत्रण कशा पद्धतीने ठेवावे, फणस पिकावरील कीड आणि त्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोण कोणते उपाय करावे, फणस पिकावरील येणाऱ्या रोगापासून पिकाला कशा पद्धतीने वाचवावे व त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, फणस पिकाची काढणी आणि त्याचे उत्पादन विक्री कशा पद्धतीने आणि कधी करावे, फणस पिकाची साठवण आणि पिकवण्याची पद्धत कशा प्रकारे केली जाते, इत्यादी सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. तर ही बातमी पूर्णपणे नक्की वाचा

मित्रांनो फणस हे फळझाड कोरडवाहू आहे या हे झाड कोरड्या ठिकाणी जास्त प्रमाणात येतात परंतु हे फणसाचे फळ कोकणातील लोकांचे लोकप्रिय फळ आहे. कोकणामध्ये दीडशे ते दोनशे वर्ष असलेले झाड कोकणात प्रामुख्याने आढळतात. त्याचबरोबर कोकणात आणि पश्चिम घाटातील जंगलात फणसाची झाडे नैसर्गिकतेत वाढलेली दिसतात. दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने नारळ कॉफी वेलदोडा सुपारी आणि काळी मिरी हे पिके प्रामुख्याने घेतले जातात. या पिकांना सावली मिळावी म्हणून फणसाची झाडे लावली जातात. पुणे मुंबई या ठिकाणी फणसाची फळे इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. म्हणून महाराष्ट्रामध्ये फणसाच्या व्यापाऱ्यांना फणसाचा व्यापार फायद्याचा ठरू लागला आहे.

फणस या फळझाड वनस्पतीचे उगमस्थान हे भारत आहे असे मानण्यात येत आहे. भारत देशातून या फणसाच्या झाडाचा प्रसार मलेशिया, वेस्ट इंडीज, इत्यादी देशांमध्ये झाला त्याचबरोबर जगात भारत, म्यानमार,श्रीलंका,जमैका, मॉरिशस इत्यादी देशांमध्ये फणसाची झाडे प्रामुख्याने आढळतात. भारतामध्ये फणसाची लागवड ही आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू आणि पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश या ठिकाणी केली जाते.

फणसाच्या फळ झाडाचे फळ हे शरीरासाठी पोषण देते असे मानले जाते. त्याचबरोबर पोषण मूल्याच्या दृष्टीने फणस हे प्रमुख फळ आहे. असे मानले जाते की फणसाच्या घरात पेक्षाही जास्त फणसाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि खनिजे तुलनेपेक्षाही जास्त प्रमाणात आढळतात. म्हणूनच फणसाच्या बिया ह्या भाजून किंवा उकडून खाणे हे कोकणातल्या लोकांची पद्धत आहे. कोकणामध्ये आणि काही ठिकाणी फणसाची कच्च्या फळांची भाजी करतात. फणसाच्या फळाचा गर आणि बी सोडता राहिलेला भाग हा जनावरांना खाद्य म्हणून वापरला जातो. 55 ते ६५ टक्के भाग वापरण्यात येतो. त्याचबरोबर फणसाच्या फळाचा गर हा पापड आणि त्याचबरोबर सुकवलेले पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या फणसाच्या फळापासून जाम, लोणचे, जेली, सरबत, फणस पोळी इत्यादी टिकाऊ पदार्थ केले जातात. फणसाचे काप हवा बंद डब्यामध्ये ठेवून साठवले जाते.

 

फणसाचे लाकूड

फणसाच्या झाडाचे लाकूड हे चांगल्या दर्जाचे मानले जाते या लाकडाचा उपयोग हा फर्निचर बनवण्यासाठी, कोकणामध्ये तसेच इतर देशांमध्ये घरासाठी फणसाचे लाकूड वापरले जाते. त्याचबरोबर फणसाचे लाकूड हे चांगले टिकाऊ असते त्यामुळे त्या लाकडाचा उपयोग शेतीतील अवजारांसाठी आणि बैलगाड्याच्या जू त्याचबरोबर विहिरीसाठी, भात गिरणीतील उखळाचे दांडे आणि बोटीसाठी तसेच फर्निचर, केबिनेटर्स आणि पेट्या इत्यादी बनवण्यासाठी फणसाच्या लाकडाचा उपयोग करतात फणसाचे लाकूड हे खूपच चांगले असते त्यामुळे युरोपात फणसाची निर्यात केली जाते. युरोपामध्ये फणसाच्या लाकडाची मोठी मागणी आहे.

फणस पिकाचे उत्पादन आणि लागवडीसाठी कोणते क्षेत्र योग्य आहे

भारत देशामध्ये फणस लागवडीसाठी 66 हजार 572 हेक्टर अंदाजे क्षेत्र आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त क्षेत्र हे बिहार आणि आसाम या राज्यात आहे आसाम मध्ये फणस लागवडीसाठी 8,000 हेक्टर आणि बिहारमध्ये 4000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे आणि दक्षिण भारतामध्ये 2000 क्षेत्र फणसाच्या लागवडीखाली आहे महाराष्ट्रात सुमारे 1000 हेक्टर क्षेत्र आहे. आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा या राज्यात फणसाची झाडे आढळतात वार्षिक उत्पन्न सुमारे 15,000 टणाच्या आसपास येते.

फणस पिकाचे योग्य हवामान पिकासाठी योग्य जमीन कुठली

फणसाचे पीक हे उष्ण कटिबंधीतील प्रदेशातील पीक आहे हे पीक कोकणात प्रामुख्याने घेतले जाते. कोकणामध्ये उष्ण आणि दमट असे वातावरण असल्यामुळे फणसाचे पीक हे चांगले प्रकारे येते. त्याचबरोबर अहमदनगर, पुणे,, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे या जिल्ह्यामध्ये फणसाची झाडे हे चांगले येतात या देशात अतिक कोरडे हवामान आणि अतिउष्ण आहे म्हणून या जिल्ह्यांमध्ये फणसाच्या झाडांना चांगल्या प्रकारे मानते. थंडीच्या वातावरणात धोके आणि कडाक्याची थंडी असल्यास फणसाच्या झाडाला वाईट परिणाम होतो. फणसाचे उत्पादनात घट झालेली आढळून येते. फणसाचे पीक घेताना कोरडवाहूच्या ठिकाणी खोल जमीन आणि कसदार असलेली लागते. त्याचबरोबर फणसाचे झाडे हे गाळात आणि खोल जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येतात आणि जांभ्या दगडापासून बनलेल्या सुपीक पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या रेताळ पोयट्या पासून किंवा तांबड्या जमिनीत फणसाची वाढ चांगले होते.

फणसाच्या सुधारित जाती

फणस या फळाचा आकार मोठा असतो. आणि त्या फळाचा गराचा रंग, मऊपणा इत्यादी वरून फणसाच्या फळांच्या जाती वेगवेगळ्या दिसतात. परंतु फणसाच्या स्थानिक जाती ह्या त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. झाडाच्या घराच्या मऊपणावरून कापा आणि बरका या दोन प्रमुख जाती पडतात. या दोन जातीचे फळे बाहेरून ओळखता येत नाहीत. या फळांच्या जाती ओळखण्यासाठी फळाच्या झाडाबद्दल संपूर्ण माहिती अगोदरच असणे आवश्यक आहे.

फणस पिकाची खत आणि पाणी व्यवस्थापना

फणसाच्या झाडाला जास्त प्रमाणात खत दिले जात नाही. पाच वर्षापर्यंत तुम्ही खत देऊ शकता फणसाचे झाड लावल्यानंतर पहिल्या वर्षी शेणखत हे 5Kg, नत्र 100 gm, स्फुरद 50 gm, पलाश 50gm याप्रमाणे तुम्ही दरवर्षी खताचे प्रमाण एक पटीने वाढवू शकता. त्याचबरोबर ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये खत देण्यात येतात. खत हे झाडाच्या बुडाशी मातीत मिसळून दिले पाहिजे लागवडीनंतर दोन वर्ष झाडाला दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी देण्यात यावे. फळ आणि फुले येण्याच्या वेळेस पाण्याचे प्रमाण हे अधिक असावे.

फणस पिकाच्या आंतरपीक आणि तन नियंत्रण

फणसाच्या पिकात सुरुवातीला तुम्ही आठ ते दहा वर्षापर्यंत दोन्ही झाडाच्या मध्ये चवळी, श्रावण घेवडा, भेंडी, मिरची, टोमॅटो,, कुळीथ, स्टायलो, हिरव्या पालेभाज्या इत्यादी आंतरपीक घेता येऊ शकते. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थापना केली आहे त्या ठिकाणी तुम्ही ही पिके घेऊ शकता. जर पाण्याची सोय नसल्यास तुम्ही आंतरपीक म्हणून शेवग्याच्या शेंगा लावू शकता. पण साच्या पिकातले तन काढले नाही तर फणसाच्या पिकाची पाणी सूर्यप्रकाश अन्नद्रव्य शोषून घेतात. त्याचबरोबर झाडाभोवती तन येऊ नये म्हणून सतत काळजी घ्यावी झाडाभोवती खुरपण करून घ्यावे. त्याचबरोबर दोन झाडांमधील मोकळी जागा मध्ये तन येऊ नये म्हणून त्या ठिकाणी हे वेळी चे पीक घ्यावे.

फणस पिकाची काढणे

फणसाचे रोपे तयार करून लावल्यास लागवडीनंतर दहा वर्षांनी पण साला उत्पादन येण्यास सुरुवात होती. आणि कलम करून केलेली लागवड सात ते आठ वर्षांनी उत्पादन येण्यास सुरुवात होते. फणसाच्या झाडाला फुलवराच्या वेळेस नर आणि मादी यांची फुले लांब लांब करत्या नीट कणीस प्रकारच्या पुष्पबंधात येतात.Fans lagvad

Leave a Comment