chaha utapadan: चहाचे उत्पन्न घेऊन कमवा लाखो रुपये..!!
चहा हे एक भारताचे फॅशन आहे. भारताचा महत्वपूर्ण आणि सर्वांना लोकप्रिय असणारे पेय म्हणजे चहा होय. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व भारतीय लोक चहा पितात चहा पिल्यानंतर बाकी सर्व काम करतात. चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही. जरी उठायला उशीर झाला तरी चहा पिल्याशिवाय काम होत नाही.चहा पिणे जेवढा फायदाच आहे तेवढाच नुकसान देखील करतो. चहा पिल्याने सकाळची झोप जाते आणि ताजे तावाने वाटते. परंतु चहा हा प्रमाणात प्यावा कारण अति चहा पिल्याने शरीरामधील कातडी जळते कारण चहा हा आपण खूप गरम गरम पितो. त्यामुळे जास्त गरम शरीराला हानी पोहोचवू शकतो. तसेच चहा आपण पितो पण हा चहा बनवण्यासाठी चहा पत्ती आपण वापरतो ती कोठे बरं तयार होत असेल. त्याचे उत्पादन घेण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध असेल कशाप्रकारे चहाची शेती केली जाते. चहाच्या पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते, त्याचे उत्पादन किती होते, त्यावर कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जातात अशा संपूर्ण माहिती बदला पण पाहूया.
चहाची शेती बहुतेक प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामध्ये आसाम पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू सिक्कम हिमाचल प्रदेश यासारख्या भागात चहाची शेती केली जाते. चहाच्या शेतीला करण्यासाठी चीनच्या क्रमांक लागतो तसेच चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चहाची शेती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच उत्पादनही भारतात चांगल्या प्रकारे होते. भारतामध्ये चहाचे उत्पादकही चांगल्या प्रकारे होते. चहाची भारतामधून इतर देशात निर्यात देखील होते. निर्यातीमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. चहा हा आरोग्यासाठी पोषक घटक मानला जातो चहा मध्ये अँटिऑक्साइड चे प्रमाण मूलभूत प्रमाणात असते चहा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.
हवामान: चहाची शेती करायची म्हटलं तर ती कुठेही केली जात नाही त्यासाठी योग्य ठिकाण योग्य वातावरण योग्य जमीन असणे त्याचबरोबर चहाच्या शेतीसाठी मातीही योग्य असणे गरजेचे असते. चहाची शेती करायची असल्यास तेथील हवामान योग्य पद्धतीने असावा म्हणजेच चहाचे पीक गरम आणि आद्र हवामानात चांगले पिकते. त्याचबरोबर दरवर्षी त्या ठिकाणी 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस असावा. चहा पिकवण्यासाठी उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय हवामान असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तापमान देखील 20° c या दरम्यान असावे.
माती: चहाची शेतीसाठी आम्लयुक्त माती असावी लागते ही माती हलकी व मध्यम पोएटू किंवा लाल माती असावी या प्रकारची माती लागवडीसाठी चांगली मानली जाते. 4.5 ते 5.5 असा साधारणपणे मातीचा असावा.
उंची: चहाच्या शेतीसाठी चहाच्या झाडीच्या झाडांची लागवड समुद्रसपाटीपासून 600 ते 2000 मीटर उंचीपर्यंत भागात केली जाते. ही शेती उंचावरील थंड हवामानाच्या ठिकाणी केली जाते चहाच्या शेतीसाठी थंड हवामान त्यांच्या पानाच्या गुणवत्ता तसेच झाडाच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. चहाची शेती ही उंचावर आणि उतरत्या जागेवर करतात.
चहाच्या लागवडीची पद्धत: चहाच्या पिकांची लागवड करण्याच्या अनेक पद्धती असतात यामध्ये बियाणे रोप लावणे किंवा छाटलेल्या रोपे लावण्यासाठी वापर करणे. चहाच्या शेतीची बियाणे द्वारे केलेली पद्धत ही फार जुनी आहे. परंतु सध्या छाटलेल्या रोपांची लागवड बहुतेक ठिकाणी जास्त प्रमाणात केली जाते. याच पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तसेच अशा पद्धतीने केलेली शेती चांगली होते व उबदार येते.
बी पेरणी पद्धत: चहाच्या पिकाची लागवड ही बियापासून सुरू होते पण ही बियांपासून तयार झालेली झाडे जास्त काळ टिकतात आणि त्याचे पीक खूप भरभरून येते. ही बी पेरणी पद्धत खूपच आव्हानात्मक असते त्यामुळे अशा पद्धतीने शेती जास्त प्रमाणात केली जात नाही.
रोपांची लागवड: या चहाच्या लागवडीच्या पद्धतीमध्ये छाटलेल्या फांद्या किंवा तयार केलेल्या रोपांचा वापर लागवडीसाठी केला जातो. या पद्धतीमुळे चहाचे उत्पादन अति वेगात येते. आणि चहा अधिक प्रमाणात तयार होतो.
छाटणी आणि व्यवस्थापना: चहाच्या पिकाची योग्य त्यावेळेस छाटणी करणे आणि उत्पादनापूर्णपणे व्यवस्था करणे तेही खूप गरजेचे आहे. चहाच्या पिकाची योग्य त्यावेळेस छाटणी केली तर चहाच्या झाडांना वाढण्यासाठी मदत होते तसेच पानांची येण्याची गुणवत्ता अधिक होते. या चहाच्या झाडांना एक ते दोन वर्षाच्या वयानंतर छाटणी करणे सुरू करावे.
कापणी करण्याची पद्धत: चहा काढणी अनेक पद्धतीने केली जाते. त्यामध्ये पारंपारिक पद्धतीने नुसार तसेच कामगाराच्या हाताने चहाचे पाने कापले जातात आणि ती चहाचे पाने कापताना चांगल्या पद्धतीने कापावी लागतात पाणी कापता वेळेस जे अनुभवी कामगार असतात तेच चहाची पाणी कापतात. तसेच चहाच्या योग्य पानांची निवड देखील तेच करतात. चहाचे पाणी वर्षातून दोन ते तीन वेळेस कापली जातात. त्याचबरोबर चहाच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी चहाच्या नाजूक कळ्या आणि झाडाच्या वरच्या दोन पानांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे खालचे झाड फुटून दाट होते.
यंत्राद्वारे कापणी
चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यंत्राद्वारे करण्यात येते यंत्राचा वापर बहुतेक ठिकाणी जास्त प्रमाणात केला जातो. कारण मोठमोठ्या चहाच्या उत्पादनात कामगार पुरेसे मिळत नाहीत म्हणून यंत्राचा वापर करतात परंतु या यंत्रामुळे मूलभूत प्रमाणात उत्पादन होत नाही. यंत्रामुळे पानांची गुणवत्ता कमी होते. कारण पाने काही गळून पडतात.
चहाच्या पानांवर प्रक्रिया
वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या उत्पन्नासाठी चहाच्या पानांवर अनेक प्रकारे प्रक्रिया करण्यात येते. चहाच्या पानांवर होणारी प्रक्रिया चहाच्या प्रकारानुसार बदलते. त्यावर प्रक्रिया करून काळा चहा, ग्रीन टी, उल्लेख चहा, पांढरा चहा, हर्बल चहा, अशा पद्धतीचे चहा बनवले जातात. चहा बनवताना केलेली प्रक्रिया अशा पद्धतीने करण्यात येते ताजे पाने गोळा करतात, गोळा केल्यानंतर त्या पानांना काही तासासाठी सुकवले जाते. पानांमध्ये असलेले अतिरिक्त पाणी पाणी सुकवल्यानंतर कमी होते. हे पाने सुकवण्यासाठी साधारणता 12 ते 18 तास अद्रवातावरणात ठेवावी लागतात. चहा तयार करण्यासाठी पाने अधिक चांगला होतो. तर इतर चहा पैकी ग्रीन टी यांची पाने जास्त पुरवणी जात नाही. त्यानंतर चहाच्या पानांना रोलिंग केली जाते. हातानेकिंवा यंत्राच्या साह्याने करण्यात येते. या पद्धतीमुळे चहाला फ्लेवर येतो. त्यानंतर या पानांना उष्णता दिली जाते म्हणजेच मुरवणे झाल्यानंतर पाने गरम केली जातात. या प्रक्रियेमुळे पानांमध्ये जे अतिरिक्त राहिलेले पाणी पूर्णपणे सुचले जाते आणि पाणी सुकवली जातात. व्यवस्थितपणे सुकल्यामुळे चहा दीर्घकाळ टिकतो. म्हणजेच चहाची टिकवण्याची क्षमता वाढते.
पिल्याने आरोग्यावर होतात फायदे
चहा ही अँटी ऑक्साईड युक्त आहे. चहा मध्ये अँटिऑक्साइडच्या प्रमाणामुळे शरीराला फायदा होतो. त्याचबरोबर चहा पिल्याने हृदयाचे आरोग्य व्यवस्थित राहते. नियमित चहा पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. चहा पिणे जेवढे फायद्याचे आहे तेवढेच नुकसान देखील करतात. चहा पिल्याने वजन देखील वाढण्यास सुरुवात होते कारण चहा मध्ये अतिरिक्त साखरेमुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढते. तसेच चहा वजन कमी देखील करतो. जो हिरवा चहा असतो म्हणजेच ग्रीन टी वजन कमी करण्यास प्रभावी आहे. त्याचबरोबर चहा चहा मध्ये थीअनाईल या नावाचा घटक असतो त्या घटकामुळे ताण तणाव कमी होतो तसेच चहा डोकेदुखीवर देखील गुणकारी मानला जातो. त्याचबरोबर चहा पचनाक्षमता सुधारण्यास मदत करतो, चहा अन्नपचन करण्यासाठी चांगला आहे जेवण केल्यानंतर चहा घेतल्यास पचनक्षमता सुधारतो.
भारतामध्ये असलेले काही प्रमुख उत्पादक क्षेत्र
आसाम: आसाम या भागाला भारतात सर्वाधिक चहाचे होणारे उत्पन्न म्हणून ओळखला जातो. गडद रंग आणि चवीला कडक असतो.
दार्जिलिंग : दार्जिलिंग हा चहा अगदी नाजूक आणि सुगंध असतो चवीला मनमोहक असतो,
निलगिरी: निलगिरी मध्ये होणाऱ्या चहाच्या उत्पादनाला चहा म्हणून ओळखला जातो.
अशा पद्धतीने चहाचे उत्पन्न त्याचबरोबर या उत्पादनात अनेक प्रकारे काळजी घेतली जाते विविध प्रक्रिया करून चहा बनवला जातो हा चहा भातात खूपच फेमस आहे.chaha utapadan