pudina sheti: पुदिना पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी, त्याचबरोबर पीक चांगल्या प्रकारे यावे म्हणून कोणती काळजी घ्यावी

pudina sheti: पुदिना पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी, त्याचबरोबर पीक चांगल्या प्रकारे यावे म्हणून कोणती काळजी घ्यावी

नमस्कार मित्रांनो आज आपण पुदिना या वनस्पती बद्दल माहिती पाहणार आहोत पुदिना ही वनस्पती औषध बनवण्यासाठी तसेच स्वयंपाक घरात वापरण्यासाठी केली जाते. पुदिन्याचा वापर हा खाद्यपदार्थांमध्ये तसेच अनेक भाज्यांमध्ये केला जातो. तसेच हा पुदिना अनेक आजारावर प्रभावी असल्यामुळे या पुदिनांची औषधे किंवा काही घरगुती उपाय मध्ये हा पुदिना वापरला जातो. हा पुदिना खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि अनेक पे यामध्ये वापरला जातो. या पेयामध्ये पुदिना वापरल्यास पेयाचे चव बदलते आणि पेय पिल्यास अगदी ताजे तवा पण वाटते. हा पुदिना पचनाच्या समस्या वर रामबाण उपाय आहे तसेच या पुदिना पासून अनेक आजार बरे होतात. सर्दी खोकला यावर देखील हा पुदिना प्रभावी आहे या पुदिनांचे गाडा करून पिल्यास पोट साफ होण्यास देखील मदत होते. या पुदिन्याची लागवड भारतामध्ये आणि ठिकाणी केली जाते या पुदिनाला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी आहे. तसेच पुदिनाला बाजारपेठ चांगले उपलब्ध आहेत.

पुदिन्याची लागवड करताना त्यासाठी योग्य हवामान आणि कशाप्रकारे जमीन निश्चित गरज लागते. त्याचबरोबर पुदिन्याची लागवड करण्याची पद्धत कशाप्रकारे आहे. पुदिन्याची लागवड केल्यानंतर पुदिनीच्या शेतीला कशाप्रकारे मशागतीची गरज लागते पाण्याची व्यवस्था खताची व्यवस्था कोणत्या पद्धतीने करावी. त्याचबरोबर या पिकाची काढणी आणि उत्पादन यासाठी कोणती पद्धत वापरावी आणि विक्री करण्यासाठी कुठले बाजारपेठ आणि कशा पद्धतीने पुदिनाला विक्रीसाठी नेले जाते. त्याचबरोबर यापुढेण्यावर कोणकोणत्या प्रकारे प्रक्रिया केली जाते व त्यापासून नवीन पदार्थ कोणते केले जातात. तसेच पुदिनांवर कोणत्याही प्रकारचा रोग किंवा कीड होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबतची आपण संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूया.pudina sheti

हवामान

पुदिन्याची लागवड करत असताना त्यासाठी योग्य हवामान पुरेसे असते. पुदिनीच्या लागवडीसाठी हवामान हे उबदार आणि मध्यम आद्रता असलेले हवे 15°c ते 30°c असलेले तापमान पुदिनासाठी उत्तम मानले जाते. पुदिनासाठी खूप उष्ण किंवा खूपच थंड असलेले हवामान योग्य नाही. या पिकाची पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होती तसेच पावसाळ्यामध्ये याचे पीक चांगले येते. तसेच हे पीठ पावसाळ्यात लावले तर लवकर येतात. परंतु जर अतिवृष्टीमुळे या पिकाची नासाडी देखील होऊ शकते.

जमीन
पुदिनीच्या लागवडीसाठी चांगल्या पद्धतीची जमीन आवश्यक आहे म्हणजेच ती जमीन चांगली निचरा होणारी हवी तसेच सेंद्रिय घटकांनी समृद्ध हलकी आणि मध्यम भारी असावे. कारण जेवढी चांगली जमीन असेल तेवढे चांगले पीक येते. या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. कारण जर जमीन योग्य निचरा करणारी नसेल जमिनीत पाणी साचून राहत असेल तर या पिकाच्या मुलांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पीक खराब होते.

पिकाचे लागवड करण्याची पद्धत
पुदिन्याची लागवड करण्याची पद्धत ही सामान्यता वाफे मार्फत केली जाते. त्याचबरोबर ही लागवड 25 ते 30 सेंटीमीटर या अंतरावर करावी. लागवड करताना पुदिन्याच्या खोडाचे तुकडे किंवा मुळाच्या कोंबा यांचा वापर करून रोग तयार करता येतात. ही रोपे तयार झाल्यानंतर 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर लागवड केले जाते. त्याचबरोबर जर तुम्ही हे पुदिना घरच्या घरी खाण्यापुरता लावित असाल तर तुम्हाला रोपे तयार करण्याची गरज नाही तुम्ही पुदिनांच्या खोडाचा वापर करून पुदिना घरच्या घरी लावू शकता. म्हणजेच पुदिना तुम्ही पुदिनांचा खोडांचे तुकडे मातीत टाकून पुदिना उगवू शकतो.

बीज पद्धत

पुदिन्याची ही बीजाच्या स्वरूपात देखील केली जाते. तसेच ही बीज पद्धत फारसी वापरली जात नाही कारण बीजापासून केलेली लागवड ही अधिक काळापर्यंत किंवा दीर्घकाळापर्यंत चांगले उत्पन्न देत नाही त्यामुळे खोडाच्या तुकडांपासून किंवा मुलांच्या कोंबड्या पासून केलेली लागवड ही अधिक फायद्याची ठरते.

खत व्यवस्थापना
पुदिन्याच्या चांगल्या पिकासाठी खताची व्यवस्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य त्या प्रमाणात खताची व्यवस्थापना केली तर पीक चांगले येते. खताचा वापर उत्तम पद्धतीने असावा. म्हणजेच चांगल्या उत्पन्नासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा. त्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्टिंग चा वापर करावा. जर तुमच्याकडे सेंद्रिय खताची उपलब्धता नसेल तर तुम्ही रासायनिक खते दिले तरी चालतील परंतु या रासायनिक खतामध्ये नायट्रोजन युक्त खताची मात्रा योग्य प्रमाणात वापरणे अधिक महत्त्वाचे असते. कारण या रसायनामुळे मातीची सुपीकता टिकून राहत नाही. जेवढं तुम्हाला रासायनिक खते टाळता येतील तेवढे टाळून सेंद्रिय खताचा वापर करावा कारण सेंद्रिय खत हे मातीत चांगले मिसळले जाते आणि मातीची सुपीकता टिकून राहते उत्पादनात देखील भर पडतो.

पाण्याची व्यवस्थापना
पुदिनाच्या पिकाला नियमित पाण्याची अत्यंत गरज असते. कारण पुदिन्याचे पीक हे निचरा होणाऱ्या जमिनीत केलेले असते त्यामुळे जमिनीत पाणी साठवून राहत नाही म्हणून पिकाला योग्य त्यावेळी पाणी द्यावे. लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात पाण्याची जास्त गरज लागते. लागवड झाल्यानंतर सात ते आठ दिवसांनी पाणी द्यावे. टिकाराम आती पाणीदेखील घातक ठरू शकते कारण अति पाण्यामुळे मुळे कुजू शकतात. जर तुम्ही पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये सिंचनाचा वापर करत असाल तर तुम्ही हा वापर चांगला आहे. तुम्ही डीप सिंचन पद्धतीचा वापर करावा या पद्धतीने पाणी दिल्यास पाणी वाया जात नाही आणि योग्य त्या ठिकाणी योग्य पाणी पोहोचते उत्पादन देखील चांगले येते.

तन नियंत्रण
पुदिना या पिकाची त्यांना मुळे वाढण्याची शक्यता वाढते त्यामुळे त्यांना वर नियंत्रण करणे अति आवश्यक आहे. या पिकामध्ये तन होऊ नये आणि झाले तर त्यावर उपाययोजना लवकरात लवकर करावा कारण तन देखील हा या पिकाप्रमाणेच जमिनीत पसरतो. एकदा जतन जमिनीत पसरला तर तो काही केल्याने निघत नाही. शेवटी पिकाचे उत्पादन कमी होते त्यामुळे तनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. तनाला नियंत्रणात ठेवायचं असेल तर जमिनीच्या पृष्ठभागावर तणनाशकाचा वापर करून त नियंत्रण ठेवू शकतो. काही वेळा जैविक तणनाशकाचा देखील वापर केला जातो. हा वापर पर्यावरणासाठी अनुकूल आहे. तना बरोबरच या पिकाला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो. त्यामुळे कीड आणि रोगावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे या पिकाच्या पानावर तांबेरा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे योग्य तो नियोजन करून नियंत्रणा ठेवावी.

काढणी करणे
पुदिना या पिकाची काढणे हे 80 ते 90 दिवसांनी करता येऊ शकते कारण पुदिनाच्या पानांमध्ये तेलाचे प्रमाण आणि सुगंधाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ही मात्रा भरून आल्यानंतर पुदिनाचे पीक काढता येऊ शकते. म्हणजेच त्यावेळेस काढावे कारण हे काढणे योग्य ठरते. पुदिन्याची काडणी करताना पुदिन्याच्या फांद्या किंवा मुळासकट ओतून घ्याव्या कारण पुदिनाच्या फांद्याचा आणि पानांचा दोन्हीचा वापर. पुदिन्याची काढणी ही एका हंगामात साधारणपणे दोन ते तीन वेळेस करता येते.10 ते 15 टन

उत्पादन मिळू शकते. उत्पादन क्षेत्रानुसार आणि व्यवस्थापनेनुसार उत्पादनात फरक पडत असतो. उत्पादन वाढण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन आणि पाण्याची नियोजन करणे खूप गरजेचे आहे. पुदिनाला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी आहे. ताजा पुदिना हा बाजारपेठ यात चांगल्या प्रकारे विकतो तसेच. वळलेला पुदिना देखील वाया जात नाही तर हा पुदिना तेलाने अर्क काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच विक्री ही होते. वाळलेल्या पुदिना पासून औद्योगिक उत्पादने तयार केली जातात. ती म्हणजे सुगंधी उत्पादने टूथपेस्ट चॉकलेट स्प्रे यासारखेया उत्पादने तयार केली जातात पानावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया करून विविध प्रकारचे उत्पादने तयार केले जातात व हे उत्पादने बाजारात चांगल्या प्रकारे विकली जातात. पुदिन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.pudina sheti

Leave a Comment