Mang Pikapasun Jast Utpnna: महाराष्ट्रात आंबा पिकाची लागवड करून जास्त प्रमाणात उत्पन्न कसे घ्यावे? आंबा पिकाची लागवड करण्यासाठी कोणती रोपे घ्यावी? संपूर्ण माहिती

Mang Pikapasun Jast Utpnna: महाराष्ट्रात आंबा पिकाची लागवड करून जास्त प्रमाणात उत्पन्न कसे घ्यावे? आंबा पिकाची लागवड करण्यासाठी कोणती रोपे घ्यावी? संपूर्ण माहिती

आंबा हे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर आंबा हे राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते म्हणून या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आंबे खायला खूप जणांना आवडते आंब्याचा सिझन चालू झाला घरोघरी आंबाचा आंबा जर तुम्ही तुमच्या शेतात आंब्याचे बाग केले तर त्याचे उत्पादन तुम्हाला मोठ्या प्रमाणात होईल. जर तुम्ही असाच काहीतरी विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आंबा लागवड बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत यामध्ये आम्ही तुम्हाला आंब्याची लागवड कशी करायची, आंब्याची लागवड करताना कोणकोणती काळजी घ्यायची, कोणत्या महिन्यात आंब्याची लागवड केली जाते, आंब्याच्या लागवडीला पाण्याची व्यवस्था कशी करायची, आंब्यासाठी शेत कसे तयार करायचे, आंब्याची लागवड करताना रोप कोणत्या पद्धतीचे आणि कोणत्या जातीचे वापरायचे, कोणत्या जातींच्या झाडांना फळे लवकर येतात, आणि फळ आल्यानंतर त्याची कारणे आणि बाजारपेठ त्याचबरोबर त्याची पॅकिंग आणि आंबे पिकवण्याचे काही उपाय ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

आंबा हा व्यवसाय महाराष्ट्रातला प्रमुख व्यवसाय आहे असे मानले जाते. भारत देशामध्ये महाराष्ट्र आंब्याच उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. महाराष्ट्रात 37% उत्पादन आंब्याचे घेतले जाते. महाराष्ट्र मध्ये आंब्याची शेती ही प्रामुख्याने राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये केली जाते. त्या ठिकाणचे हवामान हे लागवडीसाठी उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर तेथील मातीही लागवडीसाठी अनुकूल असल्याचे दिसून येते. आंब्याच्या पिकामध्ये कोणत्याही प्रकारची घट होऊ नये आणि ते पीक व्यवस्थित यावे म्हणून जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील अंबा शेतीसाठी अनुकूल प्रदेश आणि जमीन

हवामान
आंब्याचे झाड चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आणि झाडाला फळे चांगल्या प्रकारे येण्यासाठी हवामान हे उबदार आणि दमट असणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे जे आंबा लागवडीसाठी आदर्श असल्याचा दावा करत आहे. हिवाळ्याच्या हंगामात तापमान 10°c पेक्षा खाली जाऊ नये आणि उन्हाळ्यात 45°c पेक्षा जास्त होऊ नये

माती

आंबा लागवडीसाठी शेत तयार करण्या अगोदर लागवडीसाठी माती कोणत्या प्रकारची चालते ते पाहावे लागते. आंबा लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची माती आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त असलेली माती लागवडीसाठी उत्तम असते. या मातीची गुणवत्ता ही पीएच श्रेणी 6.0 ते 7.5 आहे. महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या मात्या आढळतात यामध्ये लाल माती काळी माती, लेट राईट आणि गाळाची माती या मातीमध्ये आंब्याची लागवड केली जाऊ शकते.

पाणी

आंबा हे असे पीक आहे की ज्याला सतत पाण्याची गरज भासते जितके तुम्ही पाणी द्याल तितकेच ते पीक झपाट्याने वाढू लागते. खास करून फुलांच्या आणि फळांच्या येण्याच्या हंगामात पिकाला जास्त पाणी लागते. त्याचबरोबर त्या हंगामात एक तरी पाऊस आला पाहिजे नाहीतर सिंचन ची सुविधा करून पिकाला चांगला पाण्याचा पुरवठा दिला पाहिजे.

ठिबक स्प्रे कलर फ्लड किंवा फीरो या सिंचनाच्या सर्वात सामान्य असणाऱ्या पद्धती आहेत. या पद्धतीमुळे झाडांना पाणी देणे सोपे होते आणि त्याचबरोबर पिकांना खत देण्यासाठीही हे सिंचन वापरले जाते. सिंचनामुळे पाण्याची बचत होतेच त्याचबरोबर जमिनीची धूप आणि आद्रता त्याचबरोबर तनाजी वाढ देखील होत नाही. आणि आंब्याच्या झाडांच्या मुळ्या खोल वाढीसाठी मदत होते.

आंब्याच्या जातीची निवड करणे

आंब्याच्या जातीची निवड करण्या अगोदर सर्व बाबींचा विचार करावा लागतो. तो म्हणजे त्या ठिकाणची माती कोणती आहे, तेथील वातावरण कशा प्रकारचे आहे, आंब्याच्या जातीला हे वातावरण सूट होईल का? त्या जातीच्या फळांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे का? फळाची गुणवत्ता कशी आहे? बाजारात या जातींच्या आंब्यांना मागणी कशी आहे या सर्व गोष्टी जात निवडताना लक्षात घ्यावे लागतात.

हवामान

आंब्याच्या वेगवेगळ्या जातीच्या झाडासाठी आणि फळांसाठी वेगवेगळे हवामान आवश्यक असते. ते म्हणजे हापूस आणि केसर आंबे उष्ण आणि दमट या हवामानात वाढतात. आणि इतर आंब्यांच्या जाती ह्या उष्ण, तोतापुरी आणि कोरड अधिक सहनशील हवामानामध्ये ते वाढतात.
आंब्यांच्या वाणांना देखील वेगवेगळ्या पद्धती ची माती लागते. जसे की हापूस आंब्याच्या वनांना खोल चांगल्या मित्राची आणि सुपीक मातीमध्ये वाण चांगल्या प्रकारे येते. त्याचबरोबर तोतापुरी हे वाण कमी सुपीक आणि उच्चph असलेल्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे येतात. अशा सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी लक्ष देऊन आणि ज्या जातींना जी माती अनुकूल असते त्या मातीमध्ये लागवड केली तर आंब्याचे झाडे लवकरात लवकर येतील. त्याचबरोबर वान निवडताना आणखीन एक गोष्टीची शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष द्यावी ती म्हणजे वाणही रोगप्रतिकारशक्ती असलेली हवी.Mang Pikapasun Jast Utpnna

आंबा पिकाला पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

शेतकरी मित्रांनो सर्व पिकांसाठी पाणी व्यवस्थापन करणे हे खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे असते. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आंबा पिकाला देखील पाणी व्यवस्थापन वेळोवेळी केले पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आंबा पिकाला पाणी व्यवस्थापन करण्याबद्दल माहिती पाहणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे.

कारण मित्रांनो आंबा पिकाला म्हणजेच तुम्ही लावलेल्या आंबा बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजेच आंबा पिकाला तुम्ही जर ठिबक सिंचन द्वारे पाणी दिले तर आंबा पिका भोवती जास्त प्रमाणात गवत उगणार नाही. यामुळे तुम्हाला खुरपणी किंवा तणनाशक फवारणी करण्याची आवश्यकता लागणार नाही. त्याचबरोबर आंबा पिकाला थेट बुडाला पाणी जाईल यामुळे आंबा पिकाची वाढ सुरळीत होईल. त्याचबरोबर आंबा लागवडीच्या सुरुवातीच्या काळात आंब्याला दिवसाआड आठ लिटर(अंदाजे) एका रोपाला पाणी द्यावे. त्याच बरोबर ज्यावेळेस आंबा पाच ते सहा वर्षाचा होईल त्यावेळेस तुम्ही एका आंब्याला पंधरा ते सोळा लिटर पाणी देखील देऊ शकता अंदाजे. यामुळे तुमच्या आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न येईल.

 त्याचबरोबर मित्रांनो जाणून घेऊया की, गावरान आंबा या फळाला बाजारामध्ये काय भाव मिळत आहे?

शेतकरी मित्रांनो आपल्या किरकोळ बाजारांमध्ये गावरान आंब्याला प्रति किलो कमीत कमी 80 रुपये बाजार भाव मिळत आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत आंबा पिकाला बाजार भाव मिळत आहे. तसेच बाजारात तुम्ही जर आंब्याची विक्री केली तर त्या ठिकाणी तुम्हाला केवळ पन्नास रुपयांपर्यंत कमीत कमी बाजार भाव मिळू शकेल. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुम्हाला 70 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळेल. यामुळे तुम्ही किरकोळ बाजारात आंबा विक्री करून जास्त प्रमाणात नफा कमवू शकता. तसेच गावरान आंब्याला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे यामुळे तुमचे आंबे किरकोळ बाजार देखील झटपट विकतील.

आंबा पिकापासून कोणकोणत्या वस्तू बनतात?

आंबा पिकापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्याचबरोबर रासायनिक प्रक्रिया द्वारे आंबा हा औषधांसाठी देखील वापरला जातो. त्याच बरोबर आंबा कच्चा असल्यानंतर त्यापासून लोणचे देखील बनवले जाते. आणि हे लोणचे देशभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे. यामुळे लोणचे बनवण्याच्या मोठमोठ्या कंपन्या देखील देशभरात उभा राहिले आहेत. यामुळे तुम्ही आंबा पिंकाने अगोदर देखील आंब्याची विक्री करू शकता.

आंबा पिकासाठी जमीन कशी असावी?

आंबा पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची निवड करणे देखील खूपच गरजेचे असते. मित्रांनो माहितीनुसार आंबा पिकाला कोणत्याही पद्धतीची जमीन वापरली जाऊ शकते. परंतु मध्यम ते भारी प्रतीची म्हणजेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आंबा पिकासाठी देखील योग्य राहते. म्हणजेच तुम्ही बागायती पिकासाठी काळ्या, किंवा केवटा जमिनीचा वापर करू शकता. तसेच काळ्या जमिनीमध्ये आंबा पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होईल. आणि यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात उत्पन्न देखील मिळेल.Mang Pikapasun Jast Utpnna

Leave a Comment