Dalimb Lagavad Mahiti: डाळिंब लागवड संपूर्ण माहिती मराठी मधून..!! डाळिंबाची लागवड कशी करावी?

Dalimb Lagavad Mahiti: डाळिंब लागवड संपूर्ण माहिती मराठी मधून..!! डाळिंबाची लागवड कशी करावी?

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये डाळिंब पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते? डाळिंब पिकाला एकरी किती उत्पन्न निघते? खालील पिकाची लागवड करण्यासाठी एकरी किती झाडे लागतात? डाळिंब पिकाला खत व्यवस्थापन कसे असते? डाळिंब पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे असते? डाळिंब पिकातून शेतकरी जास्तीत जास्त किती उत्पन्न घेऊ शकतो? डाळिंब पिकापासून शेतकऱ्याला किती वर्षे उत्पन्न मिळेल? डाळिंब पीक काढण्यासाठी किती उंच करावे? डाळिंब पिकाची लागवड केल्यानंतर डाळिंबाचे झाड किती उंच होऊ शकते? डाळिंब पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती औषधे फवारावे? डाळिंब पिकांमध्ये अंतर पिके घेता येतात का? याबद्दल सविस्तर माहिती या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

डाळिंब पिकाची लागवड कोणत्या हवामानात केली जाते? त्याचबरोबर डाळिंब पिकाला कोणते वातावरण चांगले मानले जाते ?

डाळिंब पिकाची लागवड ही हिवाळ्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर डाळिंब पीक हे शरीरासाठी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. त्यामुळे सध्या डाळिंब या फळाला खूपच बाजारामध्ये मागणी आहे. कारण एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला डाळिंब खाण्यासाठी डॉक्टर देखील सांगतात यामुळे नातेवाईक बाजारामधून डाळिंब त्या व्यक्तीला घेऊन जातात. त्याचबरोबर डाळिंब मागील काही दिवसांपूर्वी तब्बल दोनशे रुपये किलो होते. त्याचबरोबर सीजन आल्यानंतर डाळिंबाचे भाव नक्कीच कमी होतात परंतु काही दिवस डाळिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतात. यामुळे डाळिंबापासून लाखो रुपयांचे उत्पन्न देखील घेऊ शकतो.

डाळिंब या पिकाला उष्ण हवामान तसेच दीर्घ उन्हाळा आणि कोरडी हवा खूपच फायदेशीर असते त्याचबरोबर साधारण कडक हिवाळा देखील डाळिंबाला सर्वात चांगला मानला जातो. यामुळेच डाळिंबाची लागवड ही जास्त करून हिवाळ्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या हवामानात डाळिंबाची लागवड केली जाते. त्याचबरोबर डाळिंब हे पीक असे आहे की बाराही महिने हे उपलब्ध असते. यामुळे नागरिकांना डाळिंब पीक कधीही आवडले तर खाण्यासाठी उपलब्ध असते.

त्याचबरोबर डाळिंब पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे देखील वेगवेगळ्या जाती निघाल्या आहेत. त्याचबरोबर डाळिंब पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावे तसेच शेतकऱ्याला चांगला नफा मिळावा यासाठी तज्ञांकडून देखील वेगवेगळ्या जाती विकसित केल्या जात आहेत. ज्या जाती सर्वोत्कृष्ट आहेत त्याच जातीच्या डाळिंबाची लागवड शेतकरी सर्वात जास्त करत आहेत.

डाळिंब पिकाची लागवड कोणत्या मातीमध्ये केली जाते ?

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर डाळिंब पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शेतामध्ये हलक्या ते मध्यम प्रकारची माती असणे खूप गरजेचे आहे. कारण हलक्या ते मध्यम जमिनीत डाळिंब पिकाची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रमाणात नफा घेऊ शकतात. त्याचबरोबर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनी डाळिंब लागवडीसाठी खूपच चांगल्या मानल्या जातात. अशी संशोधनातून देखील सिद्ध झाले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्याकडे हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनी आहेत तेच शेतकरी डाळिंब पिकाची लागवड करतात. त्याचबरोबर हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात असेल तर डाळिंबाची लागवड केल्यानंतर डाळिंबाची झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात होते.Dalimb Lagavad Mahiti

त्याचबरोबर डाळिंबाच्या पिकाला वारंवार पाणी दिल्यानंतर तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्यावर डाळिंबाच्या पिकाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न होते. त्याचबरोबर डाळिंबाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन निवडावी आणि त्या जमिनीमधून पाण्याचा निचरा होणे देखील खूपच गरजेचे असते.

डाळिंब पिकाची लागवड कशी करावी ? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…

डाळिंब पिकाची लागवड करण्यासाठी योग्य ते अंतर ठेवणे देखील खूपच गरजेचे असते. यामुळे साधारणतः डाळिंब पिकाची लागवड ही 4.5 ते 3.0 मीटर एवढ्या अंतराने करावी. डाळिंबाची लागवड ही कलमापासूनच करावी. त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार बुटी कोलम लावून डाळिंब या पिकाची लागवड यशस्वी पणे करता येते.

डाळिंब पिकांमध्ये कोणती आंतरपीके घेता येतात ?

डाळिंब पिकाची लागवड केल्यानंतर शेतकरी त्या शेतामध्ये कोणकोणत्या आंतरपीकाची लागवड करू शकतो. त्याचबरोबर अंतर पिकांपासून शेतकरी किती उत्पन्न कमवू शकतो अशी संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूया.

डाळिंब पिकाची लागवड केल्यानंतर शेतकरी साधारणता दोन ते तीन वर्षांपर्यंत अंतर पिके घेऊ शकतो. यामध्ये शेतकरी कांदा, काकडी, मुग, हरभरा, सोयाबीन, चवळी, भुईमूग, मेथी, कोथंबीर, काकडी, आळूची पाने, कारली, टमाटे, मिरची त्याचबरोबर अशा इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून डाळिंबामध्ये शेतकरी लागवड करू शकतात.

शेतकरी डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून कांदा पिकाची लागवड करून एकरी जवळपास पन्नास ते एक लाख रुपयांपर्यंत नफा सहज कम होऊ शकतो. त्याचबरोबर कांदा पिकाला व्यवस्थित पाणी पुरवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कांद्याची लागवड करणे देखील खूपच जोकमीचे असते. म्हणजेच कांदा पिकाची लागवड ही व्यवस्थितरित्या करणे आवश्यक असते. त्याचबरोबर कांदा पिक व्यवस्थित केल्यानंतर शेतकरी कांदा पिकापासून देखील एक ते दोन वर्ष चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकतो. त्याचबरोबर या पिकाला टाकलेले खत तसेच या पिकावर केलेली फवारणी डाळ पिकासाठी देखील फायदेशीर ठरते.

काकडी.. या पिकापासून देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतात काकडी या पिकाची लागवड जड तुम्ही एक एकर शेतामध्ये आंतरपीक म्हणून केली तर तुम्हाला या पिकापासून केवळ चार महिन्यात तब्बल 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत नफा निघू शकतो परंतु यासाठी तुम्हाला काकडी पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे लागेल. काकडी पिकाचे पाणी व्यवस्थापन तसेच काकडी पिकाचे कीड व्यवस्थापन देखील व्यवस्थित करावे लागेल त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रमाणात नफा मिळेल.

त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही इतर आंतर पिकातून देखील मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता. यामुळे तुम्ही डाळिंबाच्या पिकातून तसेच अंतर पिकातून देखील मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच डाळिंबाची शेती परोडेल.

डाळिंब पिकाची लागवड केल्यानंतर जवळपास 30 दिवसानंतर डाळिंब पिकाची छाटणी करावी लागते परंतु छाटणी अगोदर शेतकऱ्यांनी खाली दिलेली कामे नक्की करावी.

डाळिंब पीक बहर धरण्याची वेळ कधी असते हे निश्चित करावे.
त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आंतरपशिल आणि त्या खर्चाची पूर्तता नक्की करावी.

डाळिंब पिकाच्या झाडाची छाटणी कशा पद्धतीने करावी याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया…

पानगडीनंतर दुसरा टप्पा महत्त्वाचा म्हणजे डाळिंब पिकाची छाटणी आहे. डाळिंब पिकाची छाटणी व्यवस्थित करणे खूप गरजेचे असते त्याचबरोबर वेळोवेळी डाळिंब पिकाची छाटणी करणे देखील तेवढेच गरजेचे असते. डाळिंबाच्या छाटणीवर डाळिंबाचा बहर अवलंबून असतो यामुळे डाळिंबाच्या कोणत्या फांदीवर फळ येथे हे लक्षात घेणेदेखील खूप गरजेचे असते. यामुळे डाळिंबाच्या ज्या फांदीवर होळीला आहे त्या फांदीची छाटणी करू नये आणि ज्या फांदीवर फळ येत नाही त्या फांदीची छाटणी नक्की करावी अशा बिगर छाटणीच्या फांदीवर आलेले फळ हे व्यवस्थित रित्या पोहोचत नाही म्हणजेच त्या फुलांमध्ये दाणे व्यवस्थित येत नाहीत यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होते.

डाळिंब पिकाची पोट छाटणी करणे देखील महत्त्वाचे असते यामुळे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की डाळिंब पिकाची पोट छाटणी कशी करावी? त्याचबरोबर पोट छाटणी म्हणजे काय?

डाळिंब पिकाच्या झाडावरील आतील भागात म्हणजेच खोडापासून वर आलेल्या भागात फळे येत असतात आणि यासाठी ज्या झाडाची पोट छाटणी करणे खूप गरजेचे असते पोट छाटणी केल्यानंतरच झाडाला पोटात फळे येऊ या छाटणीमध्ये असे करावे लागते की जी फांदी फळ देत आहे त्या फांदीला एक ते दोन इंच पर्यंत तसेच ठेवावे लागते आणि तिथून पुढचा भाग छाटून घ्यावा लागतो त्यानंतर त्या झाडाला पोट फळ येते.

तर मित्रांनो आपण वरील बातमीमध्ये संपूर्ण डाळिंबाची माहिती पाहिली आहे ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर यामध्ये काही माहिती चुकली असेल तर त्याची माहिती देखील आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही ही माहिती दुरुस्त करूत …धन्यवाद..Dalimb Lagavad Mahiti

Leave a Comment